Headlines

NZ vs AUS : न्यूझीलंडची धडाक्यात सुरुवात, ऑस्ट्रेलियावर 89 धावांनी दणदणीत विजय

[ad_1]

मेलबर्न : न्यूझीलंडने (New Zealand) टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2022) गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर (Australia) 89 धावांनी विजय मिळवत शानदार सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 201 धावांचे मजबूत आव्हान दिले होते. मात्र न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा 111 धावांवर ‘गेम ओव्हर’ झाला. (t 20 world cup 2022 super 12 nz vs aus new zealand win by 89 runs against australia at Sydney)

ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि पॅट कमिन्सचा (Pat Cummins)  अपवाद वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला 20 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. मॅक्सवेलने सर्वाधिक 28 आणि पॅटने 21 रन्स केल्या. तर  इतर फलंदाजांना सुरुवात तर चांगली मिळाली. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मैदानात टीकूच दिलं नाही.

न्यूझीलंडकडून टीम साऊथी आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. ट्रेन्ट बोल्टने 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. तर लॉकी फर्ग्यूसन आणि इश सोढीने प्रत्येकी 1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), फिन ऍलन, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टीम साउथी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन :  एरोन फिंच (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झॅम्पा आणि जोश हेझलवूड.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *