Numerology: जमीन- श्रीमंतीच्या बाबतीत कमाल नशीबवान असतात ‘या’ तारखेला जन्मलेली मंडळी


मुंबई : ज्योतिषविद्येप्रमाणेच अंकज्योतिषशास्त्रही व्यक्तीच्या भविष्याबाबत भाष्य करतं. कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याच्या भवितव्याचा अगदी सहज अंदाज लावता येऊ शकतो. कोणत्याही व्यक्तीला मूलांक त्याच्या भाग्यांकाप्रमाणे काम करतो.  (Birth Date Astrology)

कोणा व्यक्तीचा जन्म महिन्याच्या 15 तायरेखाल झाला असेल तर, त्याचा भाग्यांक 6 असतो. उदाहरणार्थ, 1 आणि 5 जोडल्यास 6 हे उत्तर मिळतं. तोच त्या व्यक्तीचा भाग्यांक असतो. 

भाग्यांकांमध्ये सर्वाधिक भाग्याची साथ असणारा आकडा म्हणजे 9. 

कोणत्याही महिन्यामध्ये 9, 18 आणि 27 या तारखांना जन्मलेल्यांचा भाग्यांक 9 असतो. त्यांचा स्वामी मंगळ असतो. ही मंडळी फार नशीबवान असतात. जमीन आणि भूखंडाच्या बाबतीत या मंडळींना चांगली प्रगीत करता येते. 

स्वभावानं अगदी साधीभोळी असणारी ही माणसं त्यांच्या साधेपणानंच इतरांची मनं जिंकतात. त्यांचा आत्मविश्वास जग जिंकणारा असतो. 

अंक ज्योतिषानुसार 9 आकडा भाग्यांकस्थानी असणारे लोक साहसी, निर्भीड आणि स्वाभिमानी असतात. त्यांची विनोदबुद्धी अफाट असते. इतरांच्या मदतीसाठी ही मंडळी कायम तत्पर असतात. 

मेहनत करण्यापासून ही मंडळी मागे हटत नाहीत. तर, त्यांच्या बुद्धीचातुर्याला कोणाचीही तोड नसते. यश या व्यक्तींपासुन अगदी हाकेच्या अंतरावर असतं. सतत आनंदात राहणारी ही मंडळी कायमच आजुबाजूला असणाऱ्यांची मनं जिंकतात. 

अंक ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार 9 हा भाग्यांक असणाऱ्यांची आर्थिक स्थिती फार भक्कम असते. त्यांच्याकडे जमीन जुमल्याची कमतरता नसते. वारसा हक्क म्हणूनही या मंडळींना प्रचंड संपत्ती मिळण्याचे संकेत असतात. 

आयुष्यात प्रचंड मेहनत करत ही माणसं गडगंड पैसा कमवतात आणि दिलखुलासपणे खर्चही करतात. असं करुनही त्यांना पैशाची चणचण भासत नाही. थोडक्यात या भाग्यांकाच्या मंडळींवर लक्ष्मीची सतत कृपा असते. Source link

Leave a Reply