Headlines

आता Driving Licence मुळे तुमचे चलान कधीही कापले जाणार नाही, कसं ते जाणून घ्या

[ad_1]

मुंबई : आपल्यापैकी बरेच लोक गाडी चालवतात आणि गाडी चालवणाऱ्याला वाहातुकीचे सगळे नियम माहित असलेच पाहिजेत. कारण जर चालकाने वाहातुकीचे नियम मोडले, तर त्याला चलान भारावा लागतो. त्यात लायसन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे. वाहन चालकाकडे लायसन्स नसेल, तर त्यासाठी त्याला चलान भरावा लागतो. त्यामुळे गाडी चालवताना जर तुम्ही लायसन्स विसरलात, तर तुम्हाला पैसे भरावे लागतील.

तुमच्यासोबत देखील असे कधीतरी घडले असावे. त्यावेळी तुम्ही देखील पैसे भरले असावे. परंतु आता काळजी करु नका. आता तुम्ही लायसन्स विसरलात, तरी काळजी करु नका, तुम्हाला आता चलान भरावा लागणार नाही.

खरेतरी काही काळापूर्वी, सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स डिजी लॉकरमध्ये ठेवण्याची परवानगी दिली होती, त्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सची फिजिकल प्रत तुमच्याकडे ठेवण्याची गरज भासणार नाही.

परंतु अनेकांना याची माहिती नव्हती, पण जर आता तुमच्यासोबत देखील असे घडले आणि तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स घेणे विसरला असाल, तर आज आम्ही तुम्हाला या समस्येपासून वाचण्याचा एक सोपा उपाय सांगणार आहोत.

डिजी लॉकरमध्ये कागदपत्रे ठेवा

हे एक सरकारी अॅप आहे, ज्यावर तुम्ही नोंदणी प्रमाणपत्र आणि वाहनाच्या इतर कागदपत्रांसह तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स सेव्ह करू शकता. जेव्हा तुम्हाला ट्रॅफिक पोलिस थांबवतील तेव्हा तुम्ही त्या ऍपमधून थेट वाहतूक पोलिसांना ते दाखवू शकतात. कारण सरकारी अॅपमध्ये असल्याने ही कागदपत्रे डिजिटल स्वरूपात असली तरीही ती पूर्णपणे वैध असतील.

हे फीचर आल्यापासून अनेक लोकांची समस्या संपली आहे, कारण बहुतेक लोक आपल्याजवळ स्मार्टफोन ठेवायला विसरत नाहीत, त्यामुळे या अॅपमध्ये त्यांची कागदपत्रे सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.

अॅपमध्ये कागदपत्रे सुरक्षित करण्याची प्रक्रिया काय?

डिजिलॉकर अॅपमध्ये तुम्हाला तुमच्या वाहनाची कागदपत्रे सुरक्षित ठेवायची असतील, तर त्यासाठी फॉलो केलेली प्रक्रिया अतिशय सोपी आहे, जी आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगणार आहोत.

1. जारी केलेल्या कागदपत्रांवर जा आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय शोधा आणि ड्रायव्हिंग लायसन्स निवडा. तुम्ही तुमच्या संबंधित राज्याच्या परिवहन विभाग विभागात जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स निवडू शकता.

2. तुमचा आधार डेटा आधीच लिंक केलेला असल्याने, तुमचे नाव आधीच एंटर केलेले दाखवले जाईल.

3. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सनुसार तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आणि तुमच्या वडिलांचे/पतीचे नाव टाका. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे तपशील मिळवण्यासाठी आणि कागदपत्र मिळवण्यासाठी Agree वर क्लिक करा.

4. आता तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स कागदपत्रे जारी केलेल्या विभागातून प्रवेश करण्यासाठी तयार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *