मटक्याच्या आकड्यांप्रमाणे नको, कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई द्या- गायकवाड


प्रतिनिधी । बार्शी– येथील शेतकऱ्यांना पिकविमा रक्कम मिळत नसल्याने, शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली घेराव आंदोलन करण्यात आले, बस स्थानका शेजारी असलेल्या आयसीआयसीआय लोंबर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात हे आंदोलन पार पडले.


यावेळी बोलतांना गायकवाड म्हणाले, राज्यातील सर्व पिक विमा कंपन्या या बड्या उद्योगपतींच्या असून त्या दरवर्षी शेतकऱ्यांचे पैसे लुटून स्वतःच्या तिजोऱ्या भरत आहेत. मागील काही वर्षांपासून मटक्यांच्या आकड्याप्रमाणे कमी रक्कम अदा करण्याची पध्दत पिकविमा कंपन्यांकडून राबविली जाते, परंतु शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार व कायद्यानुसार नुकसान पाहून पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी. दरवर्षी शेतकऱ्यांना कमी भरपाई दिली जाते, तर बहुतांश शेतकऱ्यांची तर पैसे बुडवले जातात.

त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने या पीक विमा कंपनीकडे पाठपुरावा करून, आठवड्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जर विमा भरपाईची रक्कम जमा करावी. अन्यथा १० दिवसांनी शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनात वििवध पीक विमा कंपनीच्या कार्यालयावर तीव्र स्वरूपाची आंदोलने होतील, याची कोणतीही पूर्वसूचना दिली जाणार नाही. या पुढील होणाऱ्या आंदोलनामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास त्याबाबत संबंधित कंपन्याच जबाबदार राहतील.


यावेळी रामकृष्ण सुर्वे, विठ्ठल गरदडे, अमोल सुर्वे, दीपक आंधळकर, विठ्ठल आंधळकर, काकासाहेब कुरुंद, भगवान हिरे, बालाजी हिरे, हुमायून मुलानी, मियाँसाहेब मुलानी, निखिल नलवडे, तानाजी सुर्वे, बाळासाहेब उजनकर, संजय उजनकर, अमोल आगलावे, बाळासाहेब आगलावे, शहाजी गुंड, महादेव गुंड, महादेव गोंदील, भास्कर कुंभार आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply