शिवसैनिकांनी माझं कार्यालय फोडलं नव्हतं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गळ्यात भगवी कापडं घालून हे काम केलं होतं असा आरोप पुण्यातील कात्रज येथील शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या घरी चहापानासाठी जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना हा गंभीर आरोप केलाय.
नक्की वाचा >> “आम्ही गद्दार, गटारातील घाण आहोत मग…”; शहाजीबापू पाटलांनी अगदी डोक्याला हात लावून आदित्य ठाकरेंना विचारला प्रश्न
“माझं कार्यालय फोडणारे जे कार्यकर्ते होते ते सेनेचे नव्हते. एखादा दुसरा असेल. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गळ्यात भगवं घालून कार्यालय फोडलं,” असं सावंत यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. कार्यालयावर हा हल्ला झाल्यानंतर मी गुवाहाटीमधूनच इशारा दिल्याची आठवणही सावंत यांनी करुन दिली. “मी त्यावेळेसही गुवाहाटीमधून सांगितलं होतं की, सगळ्यांनी आपआपल्या औकादीत रहावं. आपण कोणाशी पंगा घेतोय हे डोक्यात ठेवावं आज आम्ही सत्तेत आहोत. सत्तेचा माज आम्ही डोक्यात चढू देणार नाही. ज्यांनी कोणी कार्यालयावर दगड पाडायचा, त्या माध्यमातून मोठं व्हायचा प्रयत्न केला असेल त्यांना भविष्यात त्यांची जागा कळेल,” असं सावंत म्हणाले आहेत.
नक्की वाचा >> आता शिंदे गट आणि राज ठाकरेंच्या मनसेमध्ये संघर्ष होण्याची शक्यता; मनसेनं शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतरही नवी मुंबईत…
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या निवडक सहकाऱ्यांनी २१ जून रोजी बंड करुन नंतर २२ जूनला गुवाहाटी गाठल्यानंतर तानाजी सावंत हे सुद्धा शिंदे यांना समर्थन देत गुवाहाटीला पोहचले होते. गुवाहाटीमध्ये आमदार दाखल झाल्यानंतर तीनच दिवसांनी म्हणजेच २५ जून रोजी पुण्यातील बालाजीनगर येथील सावंत यांच्या मे. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली. तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत बंडखोर आमदारांच्या गटात सामील झाल्याने आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करत राडा घातल्याचं त्यावेळी सांगण्यात आलेलं.
नक्की पाहा >> Photos: दोन मंत्र्यांच्या ‘शिंदे सरकार’ची नकोश्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल; CM म्हणून शिंदेच्या नावे होणार ‘हा’ नकोसा विक्रम?
नक्की वाचा >> “…कारण पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा असू शकतो”; संजय राऊतांचा उल्लेख करत निलेश राणेंनी केलेलं ‘ते’ ट्विट चर्चेत
“ज्या आमदारांनी बंड केले आहे. ते शिवसेनेमुळे मोठे झाले आहे. त्या सर्वांनी हे विसरता कामा नये. जे आमदार तिकडे गेले आहेत त्या सर्वांनी पुन्हा यावे, अन्यथा आज तानाजी सावंत यांच्या ऑफिसची अवस्था झाली आहे. तशी राज्यातील अनेक बंडखोर आमदारांची होईल”, असा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी यावेळी दिला होता.