Headlines

नोरा फतेहीचा मराठमोळा थाट; लावणी पाहून माधुरीलाही शिट्टी मारण्याचा मोह आवरेना!

[ad_1]

Jhalak Dikhla Jaa 10: सौंदर्यासोबत घायाळ अदांसाठी ओळखली जाणारी नोरा फतेही (Nora Fatehi) नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. लोकप्रिय अभिनेत्रीपेकी एक असलेली नोरा तिच्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावरील नेहमी ट्रोल होताना दिसते. मात्र, तिच्या हॉट अंदाज चाहत्यांना नेहमी घायाळ करतो. अशातच आता नोराचा मराठमोळा थाट सर्वांना पहायला मिळाला आहे.

नोरा फतेही सध्या Jhalak Dikhla Jaa 10 या रियालिटी शोमध्ये परिक्षक आहे. नोरा फतेहीने चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्याचबरोबर ती डान्ससाठी (nora fatehi lavani dance) देखील मेहनत घेताना दिसते. अशातच झलक दिखला जा च्या 10 व्या सिझनमध्ये नोरा फतेहीची भन्नाट लावणी पहायला मिळली. मला जाऊद्याना घरी वाजले की बारा, या लावणीवर नोरा थिरकल्याचं पहायला मिळालं.

कलर्स टीव्हीच्या पेजवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये नोरा फतेही हिरव्या रंगाची नऊवारी साडी, सोनेरी नाथ आणि जड ज्वेलरी घातलेली दिसत आहे. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने लावणीचा (Amrita Khanwilkar lavani) धमाकेदार परफॉमन्स दिला. अमृताची लावणी पाहून माधुरी दीक्षित देखील प्रभावित झाली आणि माधुरीने थेट नोराला अमृतासोबत लावणी करण्याची विनंती केली.

Janhvi Kapoor आधी खुशी कपूरच लग्न ठरणार?, स्टारकिडच्या पोस्टने चर्चांना उधाण

माधुरीच्या (Madhuri Dixit) विनंतीला मान देऊन नोरा स्टेजवर उतरली आणि अमृतासोबत ठेका धरला. लावणी करताना नोराचे हावभाव पाहून माधुरी देखील प्रभावित होते. नोराचा डान्स पाहून माधुरीला देखील शिट्टी मारण्याचा मोर आवरता आला नाही. कलर्सने ऑफिशियल अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर केला आहे.

नोराची लावणी –

दरम्यान, तब्बल 5 वर्षांनंतर Jhalak Dikhla Jaa शोचा 10 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनमध्ये पारस कालनावट, अली असगर, रुबिना दिलीक, निया शर्मा, अमृता खानविलकर, दुती चंद आणि गश्मीर महाजन यांचे भन्नाट डान्स पहायला मिळत आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *