Nora Fatehi Controversies: Casting Director ने नोराला घरी बोलावून…


मुंबई : यशाच्या शिखरावर चढताना प्रत्येक कलाकाराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लगतो. काही उभरते कलाकार येणाऱ्या संकटाला कंटाळून वेगळ्या मार्गावर जातात, तर काही मात्र जिद्दीने स्वप्न पूर्ण करून स्वतःचं दुसऱ्यांसाठी एक उदाहरण तयार करतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नोरा फतेही (Nora Fatehi). पण नोराला देखील यश मिळवण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. या  प्रवासात अभिनेत्री अनेकदा रडली देखील. (Nora Fatehi Controversies)

1. सध्या नोरा 200 कोटी खंडणी प्रकरणी वादाच्या जाळ्यात अडकली आहे. जॅकलिन फर्नांडिसनंतर ईडीने नोरा फतेहीला या प्रकरणी चौकशीसाठी बोलावले. याप्रकरणी नोरा फतेहीची पाचव्यांदा चौकशी करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान अभिनेत्रीने खुलासा केला होता की, सुकेशने तिला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. 14 ऑक्टोबर 2021 रोजी नोरा फतेही आणि सुकेश यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. यामध्ये सुकेशने नोराला एक कोटीहून अधिक किमतीची आलिशान कार गिफ्ट केल्याची कबुली दिली होती. (Sukesh Chadrashekhar and Nora Fatehi)

2. काही महिन्यांपूर्वी नोरा फतेहीचा एक व्हिडीओ समोर आला होता. व्हिडीओमध्ये मुसळधार पावसात सुरक्षा रक्षक एकाच वेळी तिची साडी सांभाळताना आणि दुसऱ्या हाताने नोरा फतेहीची छत्री धरताना दिसला. या व्हिडीओमुळे युजर्सनी नोरा फतेहीवर निशाणा साधला. (Nora Fatehi viral video)

3. नोरा फतेही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. ती एकेकाळी अभिनेता अंगद बेदीला डेट करत होती. मात्र नंतर त्यांचे ब्रेकअप झालं. रिपोर्ट्सनुसार अंगद बेदीने नोरा फतेहीची फसवणूक केली आणि त्यामुळे त्यांचं नातं तुटलं. त्यानंतर अंगद बेदीने नेहा धुपियाशी लग्न केलं. ‘बिग बॉस’मध्ये नोराचं नाव  प्रिन्स नरुलासोबत जोडलं गेलं. (Nora Fatehi personal life)

4. एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये टेरेन्स लुईसवर नोराला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप होता. त्याचा व्हिडीओही खूप व्हायरल झाला होता. युजर्सनी सांगितले की टेरेन्सने (Terence Lewis) नोरा फतेहीला अयोग्यरित्या स्पर्श केलं आहे. पण नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसने आरोप नाकारले.  (Nora Fatehi and Terence Lewis)

5. काही वर्षांपूर्वी नोरा फतेहीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, एकदा तिच्या रूममेट्सनी तिला भूमिका देण्याच्या बहाण्याने फसवलं होतं. त्यावेळी नोरा फतेही इंडस्ट्रीत येण्यासाठी प्रयत्न करत होती. तेव्हा काही कास्टिंग एजन्सींनी तिची फसवणूक केल्याचं नोरा फतेहीने सांगितलं. (Nora Fatehi in bollywood)

6. नोरा फतेहीने तिच्या डान्सने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्रीने अनेक ब्लॉकबस्टर गाण्यांवर डान्स करत अनेकांनी नाचायला भाग पाडलं. थँक गॉड’ सिनेमातही अभिनेत्रीचं गाणं आहे. पण यासाठी एक रुपयाही मिळाला नसल्याचं अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितलं. 

7. नोरा फतेहीने एकदा करीना कपूर खानच्या (Kareena Kapoor Khan) व्हॉट वुमन वॉन्ट्स (What Women Wants ) या शोमध्ये सांगितले होते की, एका कास्टिंग डायरेक्टरने तिला आपल्या घरी बोलावून तिचा अपमान केला होता. कास्टिंग डायरेक्टरने तर नोराला सांगितले की तिच्यासारख्या लोकांची इंडस्ट्रीत गरज नाही. त्यावेळी नोराने भारत सोडण्याचा निर्णय घेतला होता.Source link

Leave a Reply