Headlines

‘एनआयए’चे देशभर छापासत्र; ‘आयसीस’शी संबंधांच्या संशयावरून नांदेड, कोल्हापूरमध्ये काहींची चौकशी

[ad_1]

पीटीआय, नवी दिल्ली, नांदेड, कोल्हापूर : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी महाराष्ट्रातील नांदेड-कोल्हापूरसह उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये छाप घातले. त्यात दहशतवाद्यांशी संबंधांच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील देवबंद येथील मदरशातून कर्नाटकातील एका विद्यार्थ्यांला अटक करण्यात आली.

महाराष्ट्रात आयसीसशी संबंध असल्याच्या संशयावरून ‘एनआयए’ने रविवारी पहाटे रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील अल्ताफ आणि इर्शाद शेख या सख्ख्या भावांची चौकशी करून सोडून दिले. दरम्यान, दुपारी शेख बंधूंच्या कार्यालयाची जमावाने तोडफोड केल्यानंतर तेथे तणावाचे वातावरण आहे. नांदेडमध्येही ‘आयएसआयएस’ या दहशतवादी संघटनेशी संबंधांच्या संशयावरून शहराच्या इतवारा भागातून तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची दिवसभर चौकशी करण्यात आली. १४ तासांच्या चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. मात्र  व्हॉट्सअप संभाषण झालेला मोबाइल आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही एनआयएने कारवाई केली. आयसिसच्या दहशतवादी कारवायांप्रकरणी मध्य प्रदेशच्या भोपाळ आणि रायसेन जिल्ह्यातही काही संशयितांचा शोध घेण्यात आला.  एनआयएने केरळमध्येही सथिक बाचा ऊर्फ आयलीएएमए सथिक याच्या अटकेच्या अनुषंगाने शोधमोहीम राबवली. सथिक बाचा याने अन्य चार साथीदारांसह गेल्या फेब्रुवारीमध्ये वाहन तपासणीवेळी पोलिसांना मारण्याचा प्रयत्न केला होता. तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील या शोधमोहिमेत काही डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘एनआयए’ने गुजरातच्याही चार जिल्ह्यांत शोधमोहीम राबवून तिघांची चौकशी केली. भडोच, सुरत, नवसारी, अहमदाबाद जिल्ह्यांतील छाप्यांत कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *