पुढच्या वर्षी Sidharth-Kiara अडकणार विवाहबंधनात? पाहुण्यांची List समोर


Sidharth-Kiara wedding : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. सेलिब्रिटींनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टनंतर आता बॉलिवूडचं आणखी एक क्यूट कपल लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री किआरा अडवाणीच्या (sidharth kiara movie) लग्नाची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचं कधी होणार, कोठे होणार, त्यांच्या लग्नात कोण-कोण हजेरी लावणार असे अनेक प्रश्न चाहत्यांकडून विचारण्यात येत आहेत. 

आलिया-रणबीरनंतर चाहत्यांना सिद्धार्थ आणि किआरा (kiara advani) यांना पती-पत्नीच्या रुपात पाहायचं आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये जानेवारी महिन्यात सिद्धार्थ -किआरा लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार सिद्धार्थ आणि किआरा पाहुण्याची यादी करण्यास देखील सुरुवात केली आहे. 

सिद्धार्थ आणि किआरा यांच्या लग्नात झगमगत्या विश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावणार आहे. रिपोर्टनुसार गेस्ट लिस्टमध्ये दिग्दर्शक करण जोहरचं नाव फायनल करण्यात आलं आहे. करण शिवाय विकी कौशल, कतरिना कैफ, वरुण धवन, जॅकी भगनानी आणि त्याची गर्लफ्रेंड रकुल प्रीत सिंग यांनाही आमंत्रण देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (sidharth kiara instagram)

वाचा | हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचं थेट Salman Khan सोबत कनेक्शन

 

 

एवढंच नाही, तर अनेक निर्माते आणि दिग्दर्शक देखील सिद्धार्थ (sidharth malhotra) आणि किआरा यांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. फक्त पाहुण्यांची यादीच नाही, तर दोघे कोठे लग्न करणार यावर देखील अनेक चर्चा रंगत आहेत. एका रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि कियारा गेल्या महिन्यापासून लग्नाच्या ठिकाणांचा शोध घेत आहेत. यादरम्यान दोघांनी चंदीगडच्या The Oberois Sukhvilas Spa & Resorts शी संपर्क साधला. (sidkiara photo)

आलिया-रणबीर पाठोपाठ बॉलीवूडचे 'हे' कपल अडकणार लग्नबंधणात... या ठिकाणी घेणार सप्तपदी

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचे लग्न येथेच झालं होतं. त्यामुळे किआरा आणि सिद्धार्थ देखील याच ठिकाणी लग्न करतील की आणखी दुसरं ठिकाण शोधतील हे त्यांच्या लग्नाच्या दिवळी कळेलच. सध्या प्रत्येक जण किआरा-सिद्धर्थला पती-पत्नीच्या रुपात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. (sid-kiara marriage) 

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं जातं. सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्यावर जाहीर शिक्कामोर्तब केलं नसलं तरी त्यांच्या लिंकअपच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. (sidkiara – twitter)Source link

Leave a Reply