Aarogyabollywood newsBreaking News

बालिका वधू फेम सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन

मुंबई – सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे गुरुवारी मुंबई शहरातील कपूर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. सिद्धार्थ शुक्ला चाळीस वर्षांचे होते.

टीव्ही मालिका बालिका वधू यात त्यांनी केलेल्या भूमिकेला लोकांमध्ये लोकप्रियता मिळाली होती. त्यांना आज सकाळी हृदयाचा झटका आल्यानंतर इस्पितळात भरती करण्यात आले होते.

कपूर हॉस्पिटलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला बोलताना सांगितले की ज्यावेळेस सिद्धार्थ शुक्ला यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले त्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला होता.

सिद्धार्थ शुक्ला यांच्या कुटुंबा मध्ये आई आणि दोन बहिणी आहेत. त्यांनी एक मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. बाबुल का आगन छुटेना या टीव्ही मालिकेनंतर त्यांनी जाने पेहचाने से , ए अजनबी , लव यू जिंदगी अशा मालिकांमधून ते दिसून आले. मात्र बालिका वधू या मालिकेने त्यांना घराघरांत पोहोचवले.

याव्यतिरिक्त ते झलक दिखला जा 6 , खतरो के खिलाडी 7 आणि बिग बॉस 13 नजर आले होते. 2014 मध्ये सिद्धार्थ सुटला आणि करण जोहर यांच्या हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात आपल्या बॉलीवूड करियरची सुरूवात केली होती.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!