नववधू प्रिया मी बावरते…. अंबानी कुटुंबात सुनेचं अद्वितीय स्वागत


मुंबई : देशातील काही प्रतिष्ठीत कुटुंबापैकी एक असणाऱ्या अंबानी कुटुंबात पुन्हा एकदा सनई- चौघडे वाजले. यावेळी हा नाद घुमला होता तो म्हणजे उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाचा. अनिल आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा, जय अनमोल अंबानी हा नुकताच विवाहबंधनात अडकला. (Anil Ambani Tina Ambani son wedding )

प्रेयसी कृष्णा शाह हिच्याशी त्यानं लग्नगाठ बांधली. फुलांनी सजलेल्या एका भव्य मंडपात यांनी सप्तपदी घेतली. 

सोशल मीडियावर या लग्नसोहळ्यातले अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. लग्नसोहळ्यासाठी कृष्णा शाह हिनं लाल रंगाच्या लेहंग्याला पसंती दिली होती. 

तिचं सौंदर्य डोळे दिपवणारं होतं. अनमोलनंही साजेसा पेहराव करत आपल्या नव्या नवरीचं स्वागत केलं. 

टीना अंबानी यांनी अतिशय आनंदात आणि कोणालाही हेवा वाटेल याच अंदाजात आपल्या सुनेचं स्वागत केलं. 

या लग्नसोहळ्यासाठी श्वेता बच्चन, नव्या नवेली, जया बच्चन, बिग बी अमिताभ बच्चन यांची हजेरी होती. शिवाय रिमा जैन, आदर जैन यांनीही या लग्नसोहळ्यात उपस्थिती लावली होती. 

कृष्णा शाह ही अतिशय सोज्वळ आणि तितकीच मनमिळाऊ असल्याचं हे फोटो पाहून लक्षात येत आहे. 

अंबानी कुटुंबात लग्न म्हटलं की त्याची चर्चा होणार नाही, असं क्वचितच. अमनिल अंबानी याच्या लेकाच्या लग्नाचीही कमाल चर्चा झाली. 

लग्नमंडपापासून ते अगदी नववधूच्या पेहरावापर्यंत साऱ्यावरच अनेकांच्या नजरा खिळल्या.

इथं मन जिंकून गेलं ते म्हणजे टीना आणि त्यांच्या या नव्या सुनेचं नातं. Source link

Leave a Reply