New Year 2023 Horoscope : नव्या वर्षात तुम्हीच ठरणार नशीबवान; पाहा कोणत्या 3 राशींना बाराही महिने फळणार


New Year 2023 Horoscope : यंदाचं वर्ष (2022) अनेक कारणांनी महत्त्वाचं आणि असंख्य घडामोडींचं होतं. या वर्षानं खुप काही दिलं, खूप काही हिरावलं. किंबहुना अजुनही या वर्षाचा अखेरचा महिला संपायला काही दिवसांचा अवधी आहे. पण, त्याआधीच सर्वांना येणाऱ्या वर्षाचे वेध लागले आहेत. ज्यांच्यासाठी हे वर्ष फारसं चांगलं नव्हतं ती मंडळी येणाऱ्या वर्षाकडून बऱ्याच अपेक्षा बाळगून आहेत. तर, ज्यांनी हे वर्ष गाजवलं ती मंडळीही येणारं वर्षसुद्धा असंच सुंदर असावं अशी आशा करत आहेत. तुम्ही यापैकी कोणत्या गटात मोडता? Confused आहात? हरकत नाही. काही अशा राशी आहेत, ज्यांच्यासाठी पुढचं वर्ष अतिशय खास असणार आहे. (New year a yearly horoscope and three lucky signs for 2023)

या राशींमध्ये तुमची रास आहे का?

आता या राशींमध्ये (Signs) तुमची रास आहे का, हे पाहूनच घ्या. कारण साधारण महिन्याभरातच तुम्ही एका संपूर्ण नव्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहात. तुम्हाला बहुविध गोष्टींसाठी, कामांसाठी तब्बल 365 दिवस 365 नव्या संधी मिळणार आहेत. 365 दिवसांमध्ये तुम्हाला आयुष्याचे वेगळे आणि तितकेच समृद्ध करणारे रंगही पाहता येणार आहेत. तूर्तास जाणून घेऊया 2023 हे वर्ष कोणत्या राशींना फळणार आहे. (new year)

मिथुन (Gemini) – 2023 हे वर्ष मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आनंदाची उधळण करणारं असणार आहे. यादरम्यान तुमचे निर्णय आणि निर्धारित लक्ष्य पूर्ण होणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी बढती आणि नवी जबाबदारी मिळणार आहे. जोडीदारासोबत अविस्मरणीय क्षण व्यतीत करण्याची संधी तुम्हाला असेल. पैसे साठवण्याचे योग्य मार्गही तुम्हाला गवसणार आहेत. अविवाहितांसाठी विवाहयोग आहेत. 

तुळ (Libra)- 2023 हे वर्ष तुमच्या करिअरच्या दृष्टीनं महत्त्वाचं असणार आहे. अर्थार्जनाच्या नव्या वाटा तुम्हाला गवसणार आहेत. नव्या वर्षामध्ये तुम्हाला नोकरीचीही अपेक्षित संधी मिळणार आहे. कुटुंबात आनंदवार्ता येणार आहे. चहुबाजूंनी तुमच्यावर सुखाची बरसात होणार आहे. 

वृश्चिक (Scorpio) – या राशीसाठी 2023 हे वर्ष खऱ्या अर्थानं फायद्याचं आहे. मुख्य म्हणजे या वर्षी तुम्हाला जीवनात वेगानं पुढे नेणाऱ्या संधी मिळणार आहेत. करिअरमध्ये नवे पर्याय उपलब्ध होणार आहेत. नव्या व्यक्तींशी भेटीगाठी होणार आहेत. यातीलच एखादी व्यक्ती तुमच्या भाग्योदयास कारण ठरणार आहे. तुमची अनेक स्वप्न पूर्ण होणार आहेत. प्रेमाच्या व्यक्तीची साथ आयुष्यभरासाठी मिळणार आहे. 

वरील तीन राशींपैकी तुमची कोणतीच रास नसल्यास निराश होऊ नका. कारण, तुमच्या वाट्याला येणाऱ्या संधी कोणीही हिरावू शकणार नाहीये. त्यामुळं स्वत:ला सिद्ध करत नशिबालाही आपल्या दिशेनं वळवा…. Happy New Year! 

(वरील माहिती सर्वसामान्य धारणांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)Source link

Leave a Reply