Aaradhya ला का ट्रोल करताहेत नेटकरी? Aishwarya Rai ला ही दिला मोलाचा सल्ला, म्हणाले…


Aaradhya Bachchan Got Trolled For Hairstyle : बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा जास्त चर्चा आजकाल त्यांच्या मुलांची असते. स्टार किड्स हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कारण प्रेक्षक हे नेहमीच त्यांच्यावर लक्ष ठेवूण असतात. बऱ्याचवेळा असं होतं की स्टारकिड्स हे लहान वयातच ट्रोलिंगचा शिकार होतात. दरम्यान, बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नातं आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) ही बऱ्याचवेळा चर्चेत असते. आराध्याला नेहमीच तिची आई ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) बच्चनसोबत दिसते. नुकतीच आराध्यानं आई ऐश्वर्यासोबत अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांच्या साखरपुड्यात हजेरी लावली होती. या दरम्यान, तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी काही नेटकऱ्यांनी आराध्याचे कौतुक केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिच्या हेअरस्टाइलची खिल्ली उडवली आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीत आराध्यानं क्रिम रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर ऐश्वर्यानं हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. आराध्या आणि ऐश्वर्याचा हा व्हिडीओ वरिंदर चावलानं शेअर केला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या आणि आराध्या दोघेही पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहे. नेहमीप्रमाणं ऐश्वर्यानं आराध्याचा हात धरला आहे. यामुळे नेटकऱ्यांनी आराध्या आणि ऐश्वर्याला ट्रोल केले आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ऐश्वर्या तिच्या मुलीचा हात का धरते?’ दुसरा एक नेटकरी म्हणाला, ‘तुझ्या मुलीला कधीतरी एकटी फिरू दे.’ काही नेटकऱ्यांनी तर आराध्याच्या हेअरस्टाईलवर कमेंट केली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘लहानपणापासून आराध्याला एकाच हेअरस्टाईलमध्ये पाहून कंटाळा आला आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘कृपया आराध्याची हेअरस्टाईल बदला. तर एका नेटकऱ्यांनं आराध्याच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. (Aaradhya Troll) 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात संपूर्ण बॉलिवूडनं हजेरी लावली हे बोलायला हरकत नाही. यावेळी सलमान खान (Salman Khan), रणवीर सिंह (Ranveer Singh), दीपिका पादुकोण (Deepika Padukone), शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि कतरिना कैफनं (Katrina Kaif) हजेरी लावली होती. शाहरुखसोबत त्याच्या संपूर्ण कुटूंबानं हजेरी लावली होती. 

हेही वाचा : Rakhi Sawant चा पोलिस स्टेशनमध्ये हटके अंदाज, ‘गंगूबाई’ स्टाईलमध्ये पडली बाहेर

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यातील एक व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होतोय. साखरपुड्याची अंगठी आणण्यासाठी इशा अंबानीने खास नियोजन केलं होतं. ‘अंगठी इथे सध्या नाहीये असं दिसत आहे. पण मला वाटतं आपल्याकडे सरप्राईज रिंगबेअरर आहे. कृपया त्याने इथे यावं,’ असं इशा अंबानी यावेळी म्हणते. यानंतर काही वेळातच त्यांचा श्वान अंगठी घेऊन मंचावर येतो.Source link

Leave a Reply