नेहा कक्करनंतर आता हृतिक रोशन फाल्गुनीच्या तावडीत? खरं कारण समोर… Video Viral


Hritik Roshan and Falguni Pathak Dance Video: हृतिक रोशन नेहमीच त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या लुक आणि अप्रतिम नृत्यशैलीसाठी ओळखला जातो. कलाकार अनेकदा त्यांच्या नृत्याने लोकांची मनं जिंकतात. हृतिकची स्टाईल सगळीकडेच लोकप्रिय आहे. आजही लोकं त्यांच्या डान्स स्टेप्सवर नाचतात. (hritik roshan tries to dance garba with falguni pathak but netizens trolls)

पण सध्या समोर येत असलेल्या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक ऋतिकला गरबा शिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. पण तो मात्र तिच्याप्रमाणे गरबा करू शकत नाही. तो मात्र आपल्या स्टाईलमध्ये नाचतो आणि त्यामुळे त्याला ट्रोलर्सही लक्ष करतात. या व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये फाल्गुनी गाण्यासोबत तो गरबा खेळतोय. त्याचवेळी हृतिक तिची कॉपी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. मग दोघेही मस्तीमध्ये आपापल्या डान्स स्टेप्स करायला लागतात. त्यानंतर हृतिक आणि फाल्गुनी त्याच्या प्रसिद्ध गाण्याचे ‘एक पल का जीना’ या गाण्यावर सिग्नेचर स्टेप करताना दिसतात. या व्हिडिओवर हृतिकच्या चाहत्यांनी त्याचं खूप कौतुक केलं आहे. तर काही नेटकऱ्यांचे म्हणणे होते की हृतिकला तर नीट गरबाही खेळता येत नाही. 

त्याचा आणखी एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. ज्यात ते बूट काढून देवीच्या दरबारात प्रवेश करतात. तो नतमस्तक होऊन देवीचे आशीर्वाद घेतो. यादरम्यान हृतिक जीन्स आणि कॅपमध्ये आला होता. तो पांढर्‍या रंगाचा शर्ट घालून कॅज्युअल लूकमध्ये दिसला. 

नुकताच हृतिकचा ‘विक्रम वेध’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ती बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे.Source link

Leave a Reply