ncp mla eknath khadse serious-allegation-on-shide-group-mla-chandrakant-patil



राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात काम न करता बिले काढण्याची स्पर्धा लागली आहे. ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने ९ कोटी रुपयांचं बिल काम न करता काढलं. नियमबाह्य कामांना स्थगिती देत हा भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच आमदार विकासकामं मंजूर करुन आणतात अन् काम न करता ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने बिले काढतात, असा आरोप त्यांनी पाटील यांच्यावर केला आहे.

हेही वाचा- “कुणी गोळीबार करतंय, कुणी शिवीगाळ करतंय, अरे काय तुझ्या बापाच्या…”, अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर आगपाखड!

खडसेंचा चंद्रकांत पाटलांवर आरोप

या प्रकरणी उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. यात उच्च न्यायालयाने तिन्ही अधिकाऱ्यांना नोटीस काढल्या आहेत. एक रुपयांचं काम न करता, कोट्यवधी रुपयांची बोगस बिले काढली जातात तसंच ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना राजकीय संरक्षण दिलं जातं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. जिल्ह्यात सर्वत्र असे प्रकार सुरु असल्याचेही खडसे म्हणाले. हा प्रकार चौकशीतून समोर आला आहे. आता उच्च न्यायालनेही त्याची नोंद घेतली आहे, असं सांगत एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे.

हेही वाचा- “ताई तुम्ही अजून एवढ्या मोठ्या झाला नाहीत”, मनसेचा सुप्रिया सुळेंना खोचक टोला! ‘त्या’ ट्वीटवरून केलं लक्ष्य!

अनेक कामांना स्थगिती

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री २० सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्याचा दौऱ्यावर आहेत. या दोघांचे मी स्वागत करतो. शेकडो कामं मंजूर आहेत. मात्र, त्यांना स्थगिती दिली आहे. तर काही कामे मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत. विकासकामांची स्थगिती उठवावी आणि इतर कामांना मंजूरी द्यावी, अशी विनंती खडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विकासकामांना निधी देतील आणि स्थगिती उठवतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.



Source link

Leave a Reply