आमदार अरुण लाड यांच्या वतीने शासनाला आमदार निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, डॉक्टर व रुग्णसेवक यांना PPE कीट तसेच गरीब गरजू महिलांना अन्न धान्य वाटपसोलापूर /विशेष प्रतींनिधी – सोलापूर येथे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री.अरुण (अण्णा) लाड यांच्या आमदार निधीतून त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन सिव्हिल सर्जन श्री.ढेले यांना सुपूर्द करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी श्री भारत वाघमारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले गटनेते चेतन नरोटे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे हे उपस्थित होते.

यानंतर माननीय आमदार यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची त्यांच्या कार्यालयात तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे सीओ श्री.दिलीप स्वामी यांची देखील त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली.

आमदार लाड यांच्या वतीने जूळे सोलापुरातील म्हाडा कॉलनी येथील शासकीय क्वारंटाइन सेंटर मधील महिला डॉक्टर तसेच रुग्णसेवक यांना १०० PPE कीट प्रदान करण्यात आले.यावेळी मनपा उपायुक्त धनराज पांडे, मनपा क्रीडाधिकारी नजीर शेख, डॉ. पल्लेलू हे प्रमुख उपस्थित होते.

यानंतर प्रभाग 21 मध्ये दक्षिण विधानसभा अध्यक्ष अमीर शेख यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार अरुण लाड यांच्या निधीतून त्यांच्या हस्ते १०० गरजू गरीब महिलांना अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी शहर पक्ष पदाधिकारी यांच्या समवेत स्थानिक नगरसेवक तौफिक शेख, इरफान शेख हे देखील उपस्थित होते. अन्न धान्य वाटप नंतर आमदार अरुण लाड यांनी पदवीधर निवडणुकीत मोलाचे सहकार्य केल्याबद्दल AIMIM चे नगरसेवक तौफिक शेख यांच्या नई जिंदगी भागातील संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली व आमदारांचा स्वागत सत्कार केला.

दौऱ्याची सांगता करताना आमदार अरुण लाड यांनी सोलापूरची आंतरराष्ट्रीय कराटेपटू कु.भुवनेश्वरी जाधव हिच्या शिवस्मारक येथील कराटे प्रशिक्षण वर्गाला सदिच्छा भेट देऊन तिने मिळवलेल्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल तिचा सत्कार केला व तिच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या प्रशिक्षण वर्गात राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविले बाबत तिचे विशेष कौतुक करत तिच्या भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी भुनेश्वरी चे वडील स्व.सुरेश जाधव यांच्या जडणघडणीच्या विशेष आठवणी सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली भुवनेश्वरीने आंतरराष्ट्रीय कीर्तीमान मिळविल्याचे सांगितले. आमदार अरुण लाड यांनी देखील प्रशिक्षण वर्गात उपस्थित खेळाडूंचे मनोधैर्य सुचविताना होणे यासारखे आंतरराष्ट्रीय ख्याती तुम्हीपण मिळवा असे सांगत मुलांना प्रोत्साहित केले व जास्तीत जास्त मैदानी खेळांकडे लक्ष द्या, तब्येत सांभाळा, आरोग्य उत्तम ठेवा असा मोलाचा सल्ला दिला.

आमदार अरुण लाड यांच्या आजच्या शहराच्या पूर्ण दौऱ्याचे नियोजन शहर कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे यांनी केले होते. याकामी त्यांना सोमनाथ शिंदे ज्योतिबा गुंड रुपेश भोसले तनवीर गुलजार प्रमोद भोसले आदी पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply