ncp mla amol mitkari criticized cm eknath shinde and dcm devendra fadnavis over vedanta foxconn picks gujrat ssa 97



वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून महाराष्ट्रात १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. मात्र, वेदांत समूहाने गुंतवणूकीसाठी गुजरात राज्याची निवड केल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे, लाखोंच्या रोजगाराला महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. तर, हा शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राला दिलेला धोका असल्याची टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी केली आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हटलं की, “वेदांत फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडी सरकारने ३९ हजार कोटींची तर गुजरात सरकारने २९ हजार कोटी रुपयांची सवलत दिली होती. तरी सुद्धा हा प्रकल्प जाणीवपूर्वक गुजरातमध्ये शिंदे सरकारने घालवला. लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले. यामुळे राज्यपाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांना आपण नक्कीच खुश केलं आहे,” असा टोला मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

हेही वाचा – गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का, आठ आमदार भाजपात प्रवेश करणार?

“सरकारचा महाराष्ट्राला धोका”

फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. “फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला वळविण्यात आला, हा शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राला दिलेला धोका आहे. स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके देणारे हे सरकार आहे. तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्यात वेदांत आणि फॉक्सकॉनने रस दाखवला होता. जूनपर्यंत हा प्रकल्प महाराष्ट्रात होता. जुलैमध्ये नवीन सरकारसोबत बैठक झाल्यानंतर आता मात्र हा प्रकल्प गुजरातला गेल्याने हे शिंदे-फडणवीस सरकारचे मोठे अपयश आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.



Source link

Leave a Reply