Headlines

ncp leader eknath khadse criticize shinde fadnavis government



राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर सतत टीका करणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. “हम तो डुबेंगे सनम, तुमको भी साथ लेकर डुबेंगे” म्हणत खडसेंनी अप्रत्यक्षरित्या भाजपाला इशारा दिला आहे. जळगावात आयोजित कार्यक्रमात त्यांनी सत्ताधारी पक्षांवर सडकून टीका केली आहे. शिंदे सरकारकडून लोकशाहीची टिंगल केली जात असल्याचा आरोपही खडसेंनी केला आहे.

हेही वाचा- उद्या महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार? राजकीय हालचालींना वेग

सगळ्यांना फक्त नाथाभाऊच दिसतो

“आडवं उभी काहीतरी स्टोरी रचायची आणि अडकवण्याचा प्रयत्न करतायचा, असे प्रकार निषेधार्थ आहेत. ईडी नावाचा प्रकार आता घरोघऱी पोहचला आहे. नाथाभाऊंच्या मागे ईडी लागली, सीबीआय लागली, अॅन्टी करप्शन लागले, एटीएस लागली. काय..काय लागली काहीच शिल्लक राहिलं नाही. यांना फक्त नाथाभाऊच दिसतो. जे व्हायचं आहे ते होऊ दे” पण माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.

वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यपालांवर टीका

राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्या मुंबईबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावरुनही खडसेंनी राज्यपालांना टोला लगावला आहे. गावातल्या लहान मुलांना राज्यपाल बोलतात कसे, चालतात कसे? काहीच माहिती नसते. मात्र, राज्यपालांच्या त्या वक्तव्यानंतर सगळ्यांना आता ते परिचित झाले असतील, असे म्हणत एकनाथ खडसेंनी मिश्किल टोला लगावला आहे.

हेही वाचा- “अरे जाऊद्या हो मंत्रिमंडळ, आधी बदनामी झाली त्याचं बघा” टीईटी घोटाळा प्रकरणी अब्दुल सत्तार आक्रमक

बंडखोरीसाठी आमदारांनी ५० कोटी रुपये घेतले असल्याचा राष्ट्रवादीचा दावा

बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह ४० आमदारांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. या बंडखोरीसाठी प्रत्येक आमदाराने ५० कोटी रुपये घेतला असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. या दाव्यावरुनच खडसेंनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. ‘यांनी कधी ५० खोके पाहिले नसतील. तुम्हाला काय हाटील, काय झाडी जे काही बघायचे असेल ते बघा. मात्र जनतेला वाऱ्यावर सोडू नका,’ असं म्हणत एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारकडून लोकशाहीची टिंगल केली जात असल्याचा आरोप केला आहे.



Source link

Leave a Reply