Headlines

ncp leader Chhagan Bhujbal commented on tipu sultan Savarkar Asaduddin Owaisi and Maharashtra politics



एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या टीपू सुलतान आणि सावरकरांवरील वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “टीपू सुलतान चार वेळा इंग्रजांशी लढले, तर सावरकरांनी इंग्रजांकडे चार वेळा माफी मागितली” असं विधान असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पलटवार केला आहे. टिपू सुलतान लढले हा इतिहास आहेच, मात्र त्याचबरोबर सावरकरांनी सुद्धा काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यामुळे त्यांचे महत्व कमी होत नाही, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्रपूजन वादात, न्यायालयाने बजावली ‘नोटीस’

नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना भुजबळांनी राज्यातील सत्तासंघर्षावर देखील भाष्य केलं. राज्यात शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी सत्तेचा पेचप्रसंग अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाही. राज्यातील या सत्तासंघर्षावर न्यायालयात उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत आपण ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. याबाबत उद्या निर्णय लागतो की घटनापीठाची स्थापना केली जाते हे पाहावे लागेल, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.

“शिवभोजनाबाबत विधिमंडळात आवाज उठवणार”

‘शिवभोजन’ एक चांगली योजना असून विद्यमान सरकारने ती यापुढेही सुरू ठेवावी. शिवभोजन केंद्रांचे पैसे अडकले असून याबाबत विधिमंडळात आवाज उठवणार असल्याचे भुजबळ नाशिकमध्ये म्हणाले. शिवभोजन केंद्र चालकांना पैसे न मिळाल्यास ही केंद्र बंद पडतील, अशी भीती भुजबळांनी यावेळी व्यक्त केली. राज्यात सत्तांतरण झाल्याने अजुनही जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत. त्यामुळे हा प्रश्न नेमका कुणाकडे मांडावा हे कळत नसल्याचे भुजबळ म्हणाले.

रिफायनरी प्रकल्पावरून रत्नागिरीत ताफा अडवताच निलेश राणे म्हणाले, “मी हात जोडून माफी मागतो…”

‘मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या पुढे येऊन खड्डे बघावेत’

रस्त्यांवरील खड्डयांवरुन छगन भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या पुढे येऊन खड्डे बघावेत, असा टोला भुजबळांनी लगावला आहे. राज्यातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे असून ते बुजवण्यात आले नाहीत, असा संतापही त्यांनी यावेळी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply