नव्याची नवलाई संपली; Ankita Lokande भर पार्टीत पतीवर का किंचाळली?


मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे काही दिवसांपूर्वीच व्यावसायिक विकी जैन याच्याशी लग्नबंधनात अडकली. अंकिता आणि विकीच्या विवाहसोहळ्यापासून त्यानंतर त्यांच्या रिअॅलिटी शोमधील एंट्रीपर्यंत प्रत्येक वेळी ही जोडी सर्वांच्या नजरा वळवून गेली. (Ankita Lokhande Vicky jain)

मुळात अंकिताचा चेहरा हा बराच प्रसिद्ध असल्यामुळं या नात्यानंही वेळोवेळी सर्वांचं लक्ष वेधलं. प्रत्येक वेळी त्या दोघांचं एकमेकांवर असणारं प्रेम स्पष्टपणे दिसून आलं. 

पण, सध्या व्हायरल होणारा व्हि़डीओ मात्र हे प्रेम वगैरे काही नसतं…. असंच म्हणायला अनेकांना भाग पाडत आहे. 

होळीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अशाच एका सोहळ्यासाठी अंकिता विकीसोबत आली होती. तिथं इतरही काही सेलिब्रिटींची हजेरी होती. 

सुरुवातीला सर्वकाही सुरळीत असल्याचं वाटतानाच पुढे मात्र एकाएकी अंकिताचा पारा चढला आणि ती विकीच्या दिशेनं संतप्त स्वरात बोलत आली. विकी अतिशय समंजसपणे तिला सांभाळून घेताना दिसला. 

आता मुद्दा असा की अंकिताचा पारा चढलेला असतानाच हे सर्वकाही कॅमेऱ्यात कैद झालं आणि हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. 

मुद्दा असा, की ज्यांनी ही ‘किती गोड जोडी आहे…’, असं म्हटलं होतं तेच नेटकरी यावेळी ‘संपली का नव्याची नवलाई’, असा टोमणाही लगावताना दिसली. 

राहता राहिला प्रश्न अंकिताला राग का आला? तर, याचं सर्वात सुस्पष्ट उत्तर खुद्द अंकिताच देऊ शकते. Source link

Leave a Reply