Headlines

Navratri 2022: नवरात्रोत्सवात मिळतोय देवीचा आशीर्वाद; कौटुंबिक आणि आर्थिक संकटापासून दूर राहण्यासाठी करा ‘हे’ उपाय

[ad_1]

Shardiya Navratri 2022 Remedies:  नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात दुर्गा मातेची(durgaa mata) भक्तिभावाने आराधना केली जाते.नवरात्रीचे हे 9 (navratri 9 days) दिवस अत्यंत महत्वाचे असतात. घराघरात देवीचे घटबसवले जातात  (Ghatasthapana 2022) भाविकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह असतो. हे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात असं म्हणतात कि या दिवसात कोणताही वाईट काम करू नये ज्यामुळे तुमचं नुकसान(loss) होऊ शकत. याउलट काही चांगली अशी काम करून तुम्ही आयुष्यात सकारात्मकता(positivity) आणू शकता जीवनात अनेक प्रकारचे ताणतणाव(stress) येतात, संकटे येतात(problems in life), मनात अशांतता असते, घरातील सदस्यांना (family members)आजारांनी घेरले असेल तर या समस्यांवर मात करण्याची योग्य वेळ आली आहे असे समजून घ्या. आदिमाया आदिशक्ती दुर्गाच्या आराधनेने ते बरे होऊ शकतात. चला जाणून घेऊया.. 

तुमच्या घरात खूप संकट आहेत,सतत अपयश येतंय 

जर तुमच्याघरात हा त्रास तुम्हाला जाणवत असेल तर नवरात्रीमध्ये माँ भगवतीची पूजा करा आणि अष्टमी(ashtami) किंवा नवमीला हवन (havan)करा. हवन करतांना ‘सब नर करीं परस्पर प्रीति चलहीं स्वधर्म निरत श्रुति नीति’ या मंत्राचा (mantra in navaratri)उच्चार करताना

समिधाचा १०८ आहुती द्या. घरात जर हवन करता येत नसेल जवळ असलेल्या मंदिरात जाऊ शकता ज्याठिकाणी हवन सुरु असेल तिथे सहभागी होऊन तुम्ही या मंत्राचा जप करू शकता आणि समिधा अर्पण करू शकता 

मंत्राचा जास्तीत जास्त 21 किंवा 27 वेळा जप करा. नामजप केल्यानंतर कौटुंबिक संकट दूर करण्यासाठी माँ भगवतीची प्रार्थना करा. माता भगवती नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्या कुटुंबाला नक्कीच आशीर्वाद मिळेल . 

आर्थिक संकटासाठी अष्टमीला ही पूजा करा

घरामध्ये आर्थिक संकट असेल, पैसे घरात टिकत नसतील(money problem) तर हा उपाय तुम्ही केलाच पाहिजे.  धनहानी होत असेल तर अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी स्नान करून ध्यान करून उत्तर दिशेला तोंड करून बसावे. अगोदर लाल रंगाचे थोडे तांदूळ घेऊन त्याचा ढीग

करून त्यावर एक स्फटिक श्रीयंत्र ठेवा. स्फटिकाचे श्रीयंत्र नसेल तर ते बाजारातून आणा आता श्री यंत्रासमोर(navratri shree yantra) तेलाचे नऊ दिवे लावा आणि आर्थिक लाभासाठी माता भगवतीची प्रार्थना करा. त्यानंतर देवघरात श्रर्यंत स्थापित करा आणि  नित्यनेमाने त्याची पूजा

अर्चना करत राहा… श्रीयंत्राला मध किंवा गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने स्नान केल्यानंतर दररोज अत्तर किंवा इतर कोणताही सुगंध लावावा. हा उपाय केल्याने माता भगवती प्रसन्न होईल आणि तुम्हाला कधीच पैशांची उणीव भासणार नाही. 

(वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *