नवऱ्याला ‘या’ चार गोष्टी बायका कधीच सांगत नाहीत, वाचा काय सांगते Chanakya Niti


Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. आचार्य चाणक्य यांचे नीति धोरणं आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ध्येय धोरणांबाबत कायमच उत्सुकता असते. आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक जीवनाविषयी अनेक गोष्टी आपल्या नीतिशास्त्रात सांगितल्या आहेत. पती-पत्नीचे नाते प्रेम आणि विश्वासावर अवलंबून असते. त्यामुळे पती-पत्नीने एकमेकांपासून कोणत्याच गोष्टी लपवू नयेत. पण चाणक्य यांच्या नीतिनुसार पाच गोष्टी पत्नी आयुष्यभर पतीपासून लपवून ठेवते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, हे असे रहस्य आहेत ज्यांच्यामुळे पती-पत्नीचे नाते मजबूत होते.

प्रणय रहस्य: पती-पत्नीच्या नात्यात प्रेम आणि प्रणय यांचाही महत्त्वाचा वाटा असतो. आयुष्यातील प्रेम आणि प्रणय या दोघांमध्ये जवळीक आणते. दोघांमध्ये घालवलेल्या क्षणांबद्दल पतीने काही विचारले तर पत्नी त्यांना अर्ध सत्य सांगते. प्रणयाबाबत पत्नीच्या अनेक इच्छा असतात. पण ती आपल्या पतीसमोर सांगू शकत नाही आणि ती आपल्या मनात लपवून ठेवते.

एकतर्फी प्रेम: आचार्य चाणक्य यांच्या नीतिनुसार, प्रत्येक स्त्रीच्या मनात कुणीतरी असतं. हे गुपित ती आयुष्यभर मनात ठेवते, ती कुणासमोरही उघड करत नाही. तिच्या पतीलाही सांगत नाही.

पैशांची बचत: घर सांभाळणे आणि चालवणे ही पत्नीची जबाबदारी असते, असे म्हणतात. तिला घरची लक्ष्मी देखील मानले जाते. संकटसमयी घर चालवण्यासाठी पत्नी पतीने दिलेल्या पैशातून काही पैसे वाचवते आणि पतीला सांगत नाही. जेव्हा कुटुंबावर संकट येते तेव्हाच ती ही माहिती देते.

आजारपण:  आचार्य चाणक्य यांच्या नीतिनुसार, स्त्रिया अनेकदा त्यांच्या आजाराबद्दल त्यांच्या पतीपासून लपवतात. ती तिचा आजार तिच्या पतीपासून लपवते कारण यामुळे तिच्या पतीला विनाकारण त्रास होऊ नये. पण हे गुपित लपवण्याचा फटका त्यांनाही चुकवावा लागतो. कधीकधी या स्थितीत आजारपण वाढते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)Source link

Leave a Reply