Headlines

नात्यांची गुंतागुंत कळेना; Ex Boyfriend ला मेसेज करत श्रीदेवींच्या मुलीनं हे काय केलं?

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्यामध्ये असणारी नाती कधी कोणतं वळण घेतील याचा काही नेम नाही. एखाद्या नात्यातून बाहेर पडत ही मंडळी त्यांच्या आयुष्यात कशा प्रकारे गुंतून जातात हे पाहताना सर्वसामान्यांना आश्चर्यच वाटतं. 

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी हिनं नुकतंच केलेलं वक्कव्य पाहता खासगी आयुष्यावर तिनं टाकलेला प्रकाशझोत पाहणाऱ्यांचेही डोळे चमकवत आहे.  (Bollywood Actress Janhvi Kapoor on equation with ex Ishaan Khatter)

हल्लीच एका मुलाखतीमध्ये जान्हवीनं Ex Boyfriend सोबतच्या नात्याचा उलगडा केला. ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जान्हवीचं नाव अभिनेता इशान खट्टर याच्याशीही जोडलं गेलं. 

सूत्रांच्या माहितीनुसार करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये इशान आणि जान्हवी एकमेकांना डेट करत होते. पण, त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही. आज या दोघांनीही कारकिर्दीत बरीच प्रगती केली आहे. अर्थात आता ते एकत्र नाहीत. पण, नात्यांमध्ये असणारी आपुलकी मात्र कायम असल्याचं जान्हवीनं स्पष्ट केलं. 

कलाकारांच्या नात्यांची गुंतागुंत कळण्यापलीकडली आहे. कारण, जान्हवीनं हल्लीच इशानला एक मेसेज केला आणि त्यांनी पुन्हा गतकाळातील दिवस आठवले. 

‘जुग जुग जिओ’ या चित्रपटातील एका गाण्याच्या निमित्तानं जान्हवीनं इशानशी संपर्क साधला. कारण ‘रंगी सारी’ हे गाणं त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी तयार करण्यात आलं होतं. जेव्हा गाणं प्रदर्शित झालं, तेव्हा ते आमचं गाणं आहे या भावनेनं मनात घर केलं आणि तू हे पाहिलंस का? असंच त्या दोघांनी एकमेकांना विचारलं. 

सध्या प्रेमाच्या नात्यापासून ते दोघंही बरेच लांब आले असले तरीही मैत्रीचं नातं मात्र घट्ट असल्याचंच जान्हवीनं स्पष्ट केलं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *