Headlines

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत भाजपाकडून सेवा पंधरवाड्याचं आयोजन | BJP organizes seva pandharwada to celebrate pm narendra modi birthday and mahatma gandhi birth anniversary rmm 97

[ad_1]

१७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७२ वा वाढदिवस आहे. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून सेवा पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हा ‘सेवा पंधरवाडा’ साजरा केला जाणार आहे, याबाबतची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सेवा पंधरवाड्याबद्दल माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. माझा वाढदिवस साजरा करू नका, लोकांची सेवा करा, अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. त्यामुळे १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असा हा सेवा पंधरवाडा आयोजित केला आहे.

“या पंधरवाड्यामध्ये जनतेला सर्व प्रकारच्या सेवा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दाखले, रेशनकार्ड, विविध मागण्या, नकाशा यासारखे इतरही जे काही प्रलंबित प्रकरणं आहेत, ते सर्व प्रश्न या पंधरा दिवसांमध्ये एका मिशन मोडवर निकाली काढायचे आहेत. या काळात लोकांना पूर्णपणे सेवा द्यायची आहे, अशा प्रकारे हा ‘सेवा पंधरवाडा’ साजरा करण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हेही वाचा- “…तर उदय सामंतांना जाळून टाकू” नाना पटोलेंसमोर भाषण करताना रिफायनरी विरोधकाचं खळबळजनक विधान

यावेळी त्यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. ज्याठिकाणी मोठ्या नैसर्गिक आपत्ती घडतात, अशा आपत्तीप्रवण क्षेत्राच्या पुनर्वसनासाठी एक धोरण मंजूर करण्यात आलं आहे. पुनर्वसन करताना नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यात येणार आहेत. आपत्तीप्रवण क्षेत्राला चिन्हांकित करण्यात येणार आहे. त्यानंतर अतिसंवेदनशील क्षेत्राचं पहिल्या टप्प्यात पुनर्वसन करायचे, आदेश आज देण्यात आले आहेत.

हेही वाचा- काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? नाना पटोलेंनी दिलेल्या ऑफरवर नितीन गडकरींचं स्पष्ट विधान, म्हणाले…

याशिवाय गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे. यामध्ये वैद्यकीय सहाय्यक, आशा, अंगणवाडी सेविका तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीच्या वेळी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी, असे निर्देश देण्यात आल्याची माहितीही फडणवीसांनी दिली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *