Nashik railway station fire broke out in Shalimar Express compartment prd 96नाशिक रेल्वेस्थानकात शालिमार एक्स्प्रेसमधील मालवाहू डब्याला आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र घटनेची माहिती होताच आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सकाळी ८.४५ वाजता ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रेल्वेस्थाकावर शालिमार एक्स्प्रेसमधील (रेल्वे क्रमांक १८०३०) मालवाहू डब्याला अचानकपणे आग लागली. या डब्यात प्रवाशी नव्हते. आगीची माहिती होताच रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळतेय.

मुंबई मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार शालिमार एक्स्प्रेसच्या रेल्वे इंजिनच्या मागे असलेल्या मालवाहू डब्याला आग लागली होती. आगीची माहिती होताच रेल्वेचे इंजिन डब्यांपासून वेगळे करण्यात आले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. लवकरच ही रेल्वे आपला पुढील प्रवासाला सुरुवात करणार आहे, अशी माहिती सुतार यांनी दिली.Source link

Leave a Reply