Headlines

मांजरीने दिली बिबट्याला रात्रभर कडवी झुंज

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील कणकोरी (सिन्नर तालका )ह्या गावात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला असून सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

बिबट्या मांजरीची शिकार करण्यासाठी मांजरी च्या पाठीमागे लावला. पाठलाग करत असताना तो विहिरीत पडला. विहिरीची खोली जास्त असल्याने मांजर आणि बिबट्या दोघे विहीर अडकून राहिले.

बिबट्या आणि मांजर रात्रभर एकमेकांसमोर गुरगुरत राहिले. बिबट्या चा आवाज आणि सकाळी आजूबाजूचे लोक गोळा झाले. त्यातील काही लोकांनी हा व्हिडीओ बनवला.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरा क्रेनच्या सहाय्याने बिबट्या व मांजरीला 25 ते 30 फूट खोल विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आणि मांजर समोरासमोर असून सुद्धा बिबट्याने माझे कोणतेही नुकसान पोहोचवले नाही. यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Leave a Reply