Headlines

Naresh Mhaske on Uddhav Thackeray group wrote letter to Election Commission claimed favour to Eknath Shinde group on election symbol “आधी मशालीचा उदो-उदो आणि आत्ता…” ठाकरे गटाच्या पत्रावरुन नरेश म्हस्केंची खरमरीत टीका; म्हणाले, “तुम्हीच भुजबळांना…”

[ad_1]

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गटाकडून चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. रणनिती उघड केल्याचा आरोप करत ठाकरे गटानं निवडणूक आयोगाला १२ मुद्द्यांचं पत्र लिहिलं आहे. या पत्रातील आरोपांना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी दिला. मग त्यानंतर तुम्हाला का कळलं नाही की आयोग तुमच्यावर अन्याय करत आहे? असा उलट सवाल म्हस्के यांनी ठाकरे गटाला केला आहे. “दोन दिवस मशालीच्या बाजूनं उदो-उदो केला, मिरवणुका काढल्या, उत्सव साजरा केला आणि आत्ता हे चुकीचं केल्याचं तुम्हाला वाटत आहे” अशी टीका म्हस्के यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली आहे.

“तुम्ही शिंदे गटाला मदत केली,’ ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, पत्र पाठवत म्हणाले “आमचे पर्याय तुमच्या वेबसाईटवर…”

“मशाल तुम्हीच मागितली होती, तुम्हीच जाहिराती केल्या. तुम्हीच छगन भुजबळांना बोलायला लावलं” म्हणत म्हस्केंनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे. हा केवळ लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे. लोक दुधखुळी नाहीत, तुमची कार्यपद्धती लोकांच्या लक्षात आलेली आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ तर शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह दिलं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांना नवं नाव आणि चिन्ह दिले आहे.

“शिंदे साहेब मर्द आहेत, उद्धव ठाकरेंनाच असले बायकी…” लटकेंच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकल्याच्या आरोपावर शिंदे गट संतापला

ठाकरे गटानं पत्रात काय म्हटलं?

नाव आणि पक्षचिन्ह वाटपात शिंदे गटाला झुकतं माप दिल्याचा आरोप निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात ठाकरे गटानं केला आहे. या पत्रात १२ मुद्दे मांडण्यात आले आहेत. आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी दिलेले पर्याय जाणुनबुजून वेबसाईटवर टाकण्यात आले. यामुळे शिंदे गटाला आमची रणनीती समजली असा ठाकरे गटाचा आरोप आहे. निवडणूक आयोगाने निर्णयात पक्षपातीपणा केल्याचा आरोपही ठाकरे गटाने केला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *