Headlines

naresh maske replied to samana rokhthok editorial alligation on cm eknath shinde spb 94



शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्रातील ‘रोखठोक’ या सदरातून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली, असा आरोप ‘रोखठोक’मधून करण्यात आला होता. त्याला आता ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा – “तुम्ही मला आता साधू बनवता का?”; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सवाल

काय म्हणाले नरेश मस्के?

“एकनाथ शिंदे यांनी ते आनंद दिघेंचे प्रतिरूप आहे, असे कधीच म्हटले नाही त्यांच्या विचारांचा वारसा ते पुढे घेऊन जात आहेत. मुळात सामना आज कोणीही वाचत नाही. शिवसैनिक देखील सामना वाचत नाही. आधीचे सामनवीर आता जेलमध्ये आहेत. त्यामुळे आताचे सामनावीर फक्त सामना वाचत असतील, पत्रकारांच्या बातम्यांमुळे दिघे साहेबांवर टाडा लावण्यात आला होता. यांचा आधी त्यांनी अभ्यास करायला हवा, वेळ आली तर आम्ही पुराव्यानिशी या गोष्टी सादर करून”, असे प्रत्युत्तर नरेश मस्के यांनी दिले आहे.

“एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंच्या जवळचे होते का? याचा खुसाला राजन विचारे करतील असे सामनातून सांगण्यात आले होते. त्यालाही मस्के यांनी प्रत्युत्तर दिले. ”राजन विचारे यांनी अवश्य खुसाला करावा. मात्र, अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे की एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंच्या किती जवळचे होते.” असे ते म्हणाले.

हेही वाचा – वरळीतील शिवसैनिकांच्या शिंदे गटात प्रवेशानंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया, पेडणेकर म्हणाल्या “आम्हालाही बघायचंय आकाशातील…”

सामनातून करण्यात आली होती टीका –

“एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्याने शिवसेना मूळ विचारापासून दूर गेली. बाळासाहेब ठाकरे किंवा आनंद दिघे यांना हे मान्य झाले नसते अशी थाप हे लोक मारत आहेत. मुळात शिवसेनेचे एक अष्टप्रधान मंडळ होते. शिवसेनाप्रमुख या अष्टप्रधान मंडळाशी चर्चा करून निर्णय घेत असत. या अष्टप्रधान मंडळात व निर्णय प्रक्रियेत आनंद दिघे नव्हते. तसेच आनंद दिघे यांना ‘टाडा’तून जामीन मिळावा यासाठी त्यांच्या काँग्रेसमधील चाहत्यांनी प्रयत्न केले. एके दिवशी पहाटे 4 वाजता यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी ‘वर्षा’वर बैठक बोलावली. काही सूचना दिल्या व दिघे यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला”, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली होती.



Source link

Leave a Reply