Headlines

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमची नोंद; जय शाह यांनी दिली माहिती

[ad_1]

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी टी-20 सामन्यादरम्यान सर्वात जास्त प्रेक्षकांच्या उपस्थितीसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केल्याची माहिती दिली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 2022 च्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) अंतिम फेरीत बीसीसीआयने हा पराक्रम केला आहे. बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली आहे.

हे स्टेडियम आधी गुजरात क्रिकेट असोसिएशन (GCA) स्टेडियम मोटेरा म्हणून ओळखले जात होते. त्याची क्षमता 110,000 प्रेक्षकांची आहे. या स्टेडियमची क्षमता ही मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) पेक्षा अंदाजे 10,000 प्रेक्षकांनी जास्त आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडची क्षमता ही 100,024 प्रेक्षकांची आहे. 1982 मध्ये बांधण्यात आलेल्या या स्टेडियममध्ये पूर्वी 49,000 चाहत्यांची बसण्याची क्षमता होती. 2021 पासून, या ठिकाणी इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसह 10 आंतरराष्ट्रीय सामन्यांचेही आयोजन करण्यात आले आहे.

बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांनी ट्विट करत ही माहिती दिली. “मला अभिमान आणि आनंद वाटतो की गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या मोटेराच्या भव्य नरेंद्र मोदी स्टेडियमचा एका टी-20 सामन्यात सर्वाधिक संख्येने प्रेक्षकांच्या गिनीज बुक रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे. 29 मे 2022 रोजी आयपीएल फायनल दरम्यान स्टेडियममध्ये 101,566 प्रेक्षक होते. हे शक्य केल्याबद्दल आमच्या चाहत्यांचे खूप खूप आभार,” असे जय शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, पुढील वर्षी भारतात 2023 च्या विश्वचषकासह, अंतिम सामन्याचे आयोजन करण्यासाठी हे ठिकाण निवडले जाण्याची शक्यता आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *