Headlines

Narayan Rane criticizes Uddhav Thackeray over Dussehra melava

[ad_1]

दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटाकडून मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप याबाबत कुणालाच परवानगी देण्यात आली नाही. तर दुसरीकडे बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठीही दोन्ही गटाकडून अर्ज करण्यात आले होते. शिंदे गटाचा अर्ज महापालिकेने स्विकारला आहे. तर शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. या दसरा मेळाव्यावरुन नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

हेही वाचा- कोकणात नाणार रिफायनरी होणारच; नारायण राणेंची ग्वाही, म्हणाले, “प्रकल्पाला विरोध केल्यास…”

उद्धव ठाकरेंचं अस्तित्व मातोश्रीपुरतंच मर्यादित

मुंबई ही शिंदे गट आणि शिवसेनेसाठी महत्वाची आहे. उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वासाठी हा दसरा मेळावा महत्वाचा वाटतो का? पत्रकारांच्या या प्रश्नावर उत्तर देत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरे ज्या दिवशी मुख्यमंत्री पदावरुन उतरले त्या दिवशी त्यांच अस्तित्व संपल. उद्धव ठाकरेंच अस्तित्व मातोश्रीपुरतचं मर्यादित होतं. त्यांच अस्तित्व महाराष्ट्रात आणि देशात कुठंच नाही. ते फ्क्त मातोश्रीच्या कक्षेपुरतचं मर्यादित होतं, असा टोलाही राणेंनी लगावला. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गटाला मिळायला हवी असंही राणे म्हणाले. दसरा मेळावा कोणाचा होणार याचा निर्णय कोर्टात होईल. तो शिंदे गटाच्या बाजूनं लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा- “मुख्यमंत्री होऊन अवघे काही दिवस झाले पण…” राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी एकनाथ शिंदेंवर उधळली स्तुतीसुमनं

दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेत रस्सीखेच

दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेना आमने-सामने आले आहेत. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. तर दुसरीकडे आता बीकेसीतील मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याची माहिती मिळत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा अर्ज महापालिकेने स्विकारला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेनेही दसरा मेळाव्यासाठी बीकेसीतील मैदानाची मागणी केली होती. मात्र, महापालिकेकडून शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार की नाही? झाल्यास कोणाचा होणार हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. शिवाजी पार्कबाबत मुंबई महापालिका काय निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *