नांदेडच्या अंध दांपत्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ठरली देवदूत

करमाळा / ए.बी.एस. न्यूज नेटवर्क –  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमुळे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील गागले गावातील एका अंध दांपत्याचा दवाखान्याचा खर्च वाचला. आरोग्यमित्रांने योग्यवेळी योग्य सल्ला दिल्यास रुग्णांचे होणारे आर्थिक नुकसान टळू शकते या घटनेतून दिसून आले.

सविस्तर माहिती पुढील अशी कि ,करमाळा तालुक्यातील वांगी नं.३  गावातील तानाजी शिंदे यांची द्वितीय कन्या अर्चना यांचा विवाह नांदेड जिल्ह्यातील चंद्रकांत गायकवाड यांच्याशी झाला होता. परंपरेप्रमाणे अर्चना हि प्रसूतीसाठी माहेरी आली होती.

आमच्याकडे पैसे नव्हते . आम्ही दोघेही अंध आहोत.आमच्या बाळाची प्रकृती बिघडली होती . काय निर्णय घ्यावा हे समजत नव्हत.  मग समर्थ बाल रुग्णालय येथील आरोग्य मित्राने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची माहिती दिली . हवी ती सर्व मदत केली आणि उपचार मोफत करून दिले  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे उपकार मी आयुष्भर विसरणार नाही . – चंद्रकांत गायकवाड

अर्चना गायकवाड यांना उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे प्रसूती ऍडमिट करण्यात आले  होते. त्यांनी तेथे २५ सप्टेंबर एका गोंडस मुलाला जन्म दिला.मात्र हायपर बिलोरोबीन (कावीळ) या आजारामुळे बाळाला खाजगी दवाखान्यात ऍडमिट करायची वेळ आली. त्यांच्या बाळाला करमाळा शहरात समर्थ बाल  रुग्णालय करमाळा येथील  अतिदक्षता विभागात (NICU) मध्ये ऍडमिट केले होते. त्यांना खाजगी दवाखान्यात रोज 5000 /- प्रमाणे खर्च झाला असता.

माझ्यामते महात्मा फुले जन आरोग्य योजना ही गोरगरीब जनतेसाठी अतिशय फायदेशीर आहे . मी या योजनेमध्ये करतो याचा मला आणि माझ्या मित्र परिवाराला सार्थ अभिमान आहे. नोकरी सोबत माझ्या हातून समाजसेवा घडत आहे. यामधून माझ्या कार्यकाळात अनेक आर्थिक दुर्ष्ट्या दुबर्ल घटकांना मदत मिळवून दिली आहे. या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा.  :-अक्षय सिद्धार्थ कांबळे (आरोग्य मित्र महात्मा फुले जन आरोग्य योजना समर्थ बाल रुग्णालय करमाळा)

मात्र करमाळा शहरातील समर्थ बाल रुग्णालय येथे कार्यरत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळाल्यामुळे त्यांचा खर्च टाळला.या योजने अंतर्गत त्यांच्या बाळास सर्व उपचार मोफत मिळाला .आरोग्य मित्राने दिलेल्या योग्य सल्ल्याने त्यांचा हा खर्च आणि मनस्ताप दोन्ही टळला.डॉ.उदयसिंग गायकवाड यांच्या देखरेखखाली बाळावर उपचार झाले.बाळाला ३ ओक्टोंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला.

Leave a Reply