Headlines

nana patole criticized shinde fadnavis government over cabinet expansion spb 94

[ad_1]

राज्यात सध्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात सध्या दोन जणांचं अपंग मंत्रिमंडळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने राज्याचंदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व प्रकारावर महामहीम राज्यपाल शांत का आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

लोकशाहीची थट्टा करणं एवढंच सद्या शिंदे-फडणवीस याचं काम आहे. राज्यात बहूमतातलं सरकार असताना दुसऱ्या पक्षातून आमदार फोडून सरकार बनवण्याची मोहीम केंद्रातल्या भाजपा सरकारने सुरू केली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातली जनता भोगत आहे. ही लोकशाहीची थट्टा असल्याचे नाना पटोले म्हणाले. राज्यातही दोन जणांचं अपंग सरकार अस्तित्वात आहे. त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही. हे सरकार असंविधानिक आहे. राज्यात मंत्रिमंडळात १२ किंवा २४ मंत्री असल्याच हवे, असे संविधानात लिहिले आहे. या सर्व प्रकारावर महामहीम राज्यपाल शांत का आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

हेही वाचा – अकोला : शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांना घरातूनच धक्का; बंधू संजय जाधव शिवसेनेतच!

रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान, आज विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनीही मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्य सरकारवर टीका केली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे, अशा वेळी पालकमंत्र्यांची जबाबदारी महत्त्वाची असते. मात्र, दुर्दैवाने मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झाला नसल्याचे ते म्हणाले होते. तसेच लवकरांत लवकर मंत्रिमंडळ विस्तार करण्याची विनंतीही त्यांनी केली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *