Nana patole clarification on aslam shaikh meeting with mohit kambhioj and devendra fadnavis spb 94



काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मोहित कंबोज यांच्या गाडीतून दोघही निघाले होते. यावरून अनेक राजकीय चर्चांना उधाण आले होते. यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कंबोज आणि अस्लम शेख यांची भेट केवळ योगायोग होता, अस ते म्हणाले.

हेही वाचा – करोना लसीकरण मोहीम संपताच CAA लागू करणार, अमित शाह यांचं मोठं विधान

काय म्हणाले नाना पटोले?

अस्लम शेख मुख्यमंत्र्यांना भेटले होते. कारण अस्लम शेख हे मंत्री असताना त्यांनी मच्छीमारांसाठी काही चांगले निर्णय घेतले होते. ते निर्णय या सरकारने थांबवले आहेत. त्यामुळे मच्छामाऱ्यांच्या हितासाठी अस्लम शेख हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटले, अशी माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

हेही वाचा – “बाकीच्या खुर्च्या त्यांच्याकडे बघत असतात, हे दोघं…”; शिंदे सरकारच्या बैठकीसंदर्भातील स्वत:च्याच विधानावर अजित पवारांना हसू अनावर

मोहित कंबोज-अस्लम शेख भेटीसंदर्भातही स्पष्टीकरण

यावेळी बोलताना त्यांनी मोहित कंबोज आणि अस्लम शेख यांच्या भेटीसंदर्भातही माहिती दिली. अस्लम शेख देवेंद्र फडणवीसांची भेट घेत होते, तेंव्हा या ठिकाणी मोहित कंबोज नावाची व्यक्ती होती. त्यांचा वाढदिवस होता. अस्लम शेख तिथे आले. तेंव्हा मोहित कंबोजदेखील तेथे आले होते. हा केवळ योगायोग होता. तसेच ते शेजारीच राहत असल्याने एकाच गाडीतून निघाले. या भेटीचा चुकीचा अर्थ काढू नये, असेही पटोले म्हणाले.



Source link

Leave a Reply