Headlines

नागराज फक्त निमित्त; बिग बींच्या ‘झुंड’मागची खरी प्रेरणा कोण?

[ad_1]

मुंबई : नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनात साकारलेला बहुप्रतिक्षित ‘झुंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आणि हळुहळू त्याचा प्रत्येक पैलू उलगडू लागला. बिग बी, अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात साकारलेली भूमिका अर्थातच बऱ्याच चर्चांना वाव देऊन गेली. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवून गेली. (Jhund Movie Amitabh bachchan Vijay barse)

अमिताभ बच्चन यांनी नेमकी या चित्रपटात कोणाची भूमिका साकारली होती, असाच प्रश्न कित्येकांनी विचारला आणि मग समोर आला ‘झुंड’मागचा खरा चेहरा. 

क्रीडा प्रशिक्षक  विजय बरसे (Vijay Barse) यांच्या जीवनप्रवासावर हा चित्रपट आधारित आहे. ज्यांनी झोपडपट्टी भागात राहणाऱ्या मुलांना एकत्र आणत त्यांच्या जीवनाला एक ध्येय्य दिलं होतं. 

बरसे यांचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. त्यांना बऱ्याच आव्हानांचाही सामना करावा लागला. फुटबॉल खेळण्यासाठी पहिल्यांदा जेव्हा त्यांनी ही मुलं पाहिली, तेव्हाचा प्रसंग ते आजही विसरलेले नाहीत. 

बरसे यांनी पुढे फक्त झोपडपट्टीमधील मुलांसाठीच एका स्पर्धेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला. 2001 मध्ये त्यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत 128 टीमचा सहभाग होता. 

बरसे यांनी तयार केलेल्या झोपडपट्टीमधील फुटबॉलचा हा प्रवास स्लम सॉकर म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे हा प्रवास अतिशय सुरेख वेगानं सर्वांनाच थक्क करत गेला. 

2003 मध्ये बरसे पहिल्यांदा प्रकाशझोतात आले आणि त्यांच्या कामाकडे कौतुकानं पाहिलं गेलं. राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या या फुटबॉल टीमनं मजल मारली आणि अनेक मुलांनी यात सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त केली. 

सुरुवातीला बरसे यांच्या या कामात त्यांना आर्थिक पाठबळ देणारं कोणीही नव्हतं. पण, जेव्हा अमेरिकेत असणाऱ्या त्यांच्या मुलानं तेथील स्थानिक वृत्तपत्रात आपल्या वडिलांविषयीचा लेख पाहिला, तेव्हा तो वडिलांच्या मदतीसाठी मायदेशी परतला. 

खुद्द नेल्सन मंडेला यांनीही बरसे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. मी एक शिक्षक आहे, मी फुटबॉलला नाही तर त्या माध्यमातून होणाऱ्या प्रगतीला आणि विकासाला महत्त्वं देत आहे, असं बरसे एका मुलाखतीत म्हणाले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *