Headlines

Nagar Beed Parli Railway will run from today till Aashti Dhananjay Munde expressed his feelings msr 87

[ad_1]

परळी-बीड-नगर रेल्वे मार्गावर आज पहिल्यांदाच नगर ते आष्टी अशी प्रवासी रेल्वे धावणार आहे. अहमदनगर ते आष्टी पहिली प्रवासी रेल्वे सुरू होत असून, याचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ऑनलाईन उपस्थिती) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्याबरोबर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची देखील उपस्थिती असणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्वीटद्वारे भावना व्यक्त केली आहे.

“माझ्यासह सबंध बीड जिल्हावासीयांच्या जिव्हाळ्याची नगर-बीड-परळी रेल्वे आजपासून आष्टीपर्यंत धावणार,याचा जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून मनस्वी आनंद आहे.यासाठी योगदान देणारे गोपीनाथराव मुंडे, विलासराव देशमुख, बीड रेल्वे कृती समितीचे सर्व सदस्य यांचे स्मरण होते.” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भावना व्यक्त केली आहे.

धनंजय मुंडेंनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, “विलासराव देशमुख यांनी हा रेल्वेमार्ग गतीने पूर्ण व्हावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री असताना,या प्रकल्पाचा अर्धा खर्च केंद्राच्या बरोबरीने राज्य सरकार उचलेल,असा निर्णय घेतला होता,त्यामुळे निश्चितच या प्रकल्पाला गती मिळाली. सुनील प्रभू यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री असताना आमच्या विनंतीवरून या रेल्वेमार्गाचे काम नगर व परळी असा दोन्ही बाजुंनी गतीने सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला; मात्र पुढे परळीच्या बाजूने या कामाची गती स्थिरावली आहे. या बाजूनेही पुन्हा वेगाने काम सुरू ठेवणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीने सत्ता असताना देखील या प्रकल्पाच्या कामास ठरलेल्या सूत्राप्रमाणे निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला. केंद्राच्या सुधारित आराखड्याच्या समप्रमाणात या प्रकल्पाचा खर्च देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता व तो आजही कायम आहे.”

पाहा व्हिडीओ –

याचबरोबर “आज नगर ते आष्टी रेल्वे मार्गाचे उद्घाटन होत असताना जिल्हावासीयांना आनंद होत आहे. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने या कामाला दोन्ही बाजुंनी गती देऊन संपूर्ण रेल्वे मार्गाचे काम लवकर पूर्ण करावे व नगर ते परळी पर्यंत रेल्वे गाडी धावावी,यासाठी आवश्यक निर्णय घ्यावेत. बीडच्या आमच्या रेल्वेचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वजण निधीसह आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता कराल,ही अपेक्षा आहे.” असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *