नागा चैतन्यपासून वेगळं झाल्यानंतर सामंथा रुथ प्रभूचं मोठं वक्तव्य म्हणाली; ‘माझं अफेअर’…


मुंबई : अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिने अलीकडेच हैदराबाद येथे एका कार्यक्रमात आध्यात्मिक गुरू सद्गुरूंची भेट घेतली. त्याच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान, अभिनेत्रीने विचारलं की, काय एखाद्याच्या जीवनावर त्याच्या भूतकाळातील कृतींचा परिणाम होतो का? या प्रश्नाला उत्तर देत सद्गुरू म्हणाले, ‘मला वाटतं दुनिया माझ्याशी  निष्पक्ष असावं, हा शाळेतील विद्यार्थ्याचा प्रश्न आहे.’ याशिवाय समंथा तिच्या आणि एक्स पती नागा चैतन्यशी संबंधित अफवांवरही बोलली.

समंथाने सद्गुरूंना प्रश्न विचारला
सामंथा रुथ प्रभू आणि सद्गुरू यांनी आध्यात्मिक जीवनावर चर्चा केली. सद्गुरूंच्या Save Soiच्या जर्नीमुळे दोघांची भेट झाली. यावेळी समंथा रुथ प्रभू याच्याशिवाय तेलंगणाचे उद्योगमंत्री के. टी. रामारावही तेथे उपस्थित होते.

त्याचबरोबर, समंथा आणि सद्गुरू यांच्यातील एका सेगमेंटदरम्यान, अभिनेत्रीने एक प्रश्न विचारला ‘एखाद्या व्यक्तीचं आयुष्य त्याच्या भूतकाळातील कर्मांचे किती फळ आहे?’ यावर सद्गुरुंनी समंथाला हे विचारून उत्तर दिलं की, तिला अजूनही जगाने तिच्याशी निष्पक्षवागण्याची अपेक्षा आहे का? ते पुढे म्हणाले, ‘आतापर्यंत तुम्हाला हे समजलं पाहिजे की जग निष्पक्ष नाही आहे’.

अफेअरच्या अफवावर सामंथा म्हणाली
2021 मध्ये, समंथा रुथ प्रभूने पती आणि अभिनेता नागा चैतन्यपासून वेगळं होण्याची घोषणा केली. दोघांनी 2017 मध्ये लग्न केलं आणि त्यानंतर 4 वर्षांनी म्हणजेच 2021 मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला. समंथा आणि नागाच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. याबद्दल बोलताना समंथा म्हणाली, ‘माझं अफेअर असल्याचं बोललं जात होतं,

मला कधीच मुलं नको होती आणि मी गर्भपात केला. घटस्फोट ही एक अत्यंत क्लेशदायक प्रक्रिया आहे. मला ठिक होण्यासाठी वेळ द्या. माझ्यावर वैयक्तिकरित्या असे हल्ले झाले. पण मी तुम्हाला वचन देते की पण मी हे कधीही मला त्रासदायक होवू देणार नाही. समंथा लवकरच विजय देवरकोंडासोबत ‘खुशी’ या तेलगू चित्रपटात दिसणार आहे.Source link

Leave a Reply