मिस्ट्री गर्ल Kaviya Maran ला दक्षिण आफ्रिकेतून लग्नाची मागणी; LIVE सामन्यात असं काय झालं? पाहा VIDEO


Kaviya Maran : आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद (SRH) हा संघ कधी जास्त कोणाच्या नजरेत येत नाही. सनरायझर्सच्या खेळाडूंची चर्चा जास्त होताना दिसत नाही. मात्र, सनरायझर्स हैदराबाद संघ लक्षात राहतो तो संघाच्या मालकिनीमुळे. तिचं नाव काव्या मारन… मिस्ट्री गर्ल म्हणून सर्वांनाच्या नजरेला भावलेल्या काव्याला (Mystery Girl Kaviya Maran) क्रिकेटची आवड आहे. हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) सामना असेल तेव्हा काव्या नेहमी उपस्थित असते. हीच काव्या मारन पुन्हा चर्चेत आली आहे. त्याला कारण ठरतंय, काव्याला थेट साऊथ अफ्रिकेतून (South Africa) लग्नाचं निमंत्रण.  (kaviya maran gets a marriage proposal from a south african fan in sa t20 league video latest marathi news)

क्रिकेटविश्वात फक्त क्रिकेटर्सची नव्हे, तर त्यांच्या बायकोंची, मिस्ट्री गर्ल्सची आणि सौंदर्यवतींची सुद्धा चर्चा होते. काव्या मारनसाठी आम्ही संपूर्ण ऑक्शन पाहिली, असं म्हणणारा एक वर्ग आहे. तर दुसरीकडे साऊथ अफ्रिकेत देखील काव्याची क्रेझ वाढताना दिसते. दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या टी 20 लीगमध्ये देखील काव्याने नशिब आजमावलं आणि संघ खरेदी केलाय. SA 20 लीगमध्ये सनरायजर्स ईस्टर्न कॅपचा (Sunrisers Eastern Cape) सामना 19 जानेवारीला पार्ल रॉयल्ससोबत (Paarl royals) होता. काव्या मारन हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होती.

आणखी वाचा – IPL 2021: मिस्ट्री गर्ल Kaviya Maran मुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ

सनरायजर्स ईस्टर्न कॅप विरुद्ध पार्ल रॉयल्स सामन्यात पार्ल रॉयल्सने प्रथम फलंदाजी केली त्यावेळी 8व्या ओव्हरवेळी एका चाहत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. त्या चाहत्याचे हातात एक बॅनर होता. तो बॅनर कॅमेरामध्ये कैद झाल्याचं पहायला मिळातंय. काव्या मारन तु माझ्याशी लग्न करशील का?, असा सवाल चाहत्याने (kaviya maran gets a marriage proposal) काव्याला विचारला. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल (sa t20 league video) होताना दिसतोय.

कोण आहे Kaviya Maran ?

न्यूयॉर्क विद्यापीठाशी संलग्न असलेल्या लिओनार्ड अँड स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलेली काव्याला क्रिकेटची आवड आहे. एमबीए पूर्ण केल्यानंतर, काव्या मारन संघाची रणनीती विकसित करण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) सोबत काम करते. तिच्या सौंदर्यामुळे ती नेहमी चर्चेचा विषयात असते.

पाहा Video – 

6 ऑगस्ट 1992 रोजी चेन्नईमध्ये जन्मलेल्या काव्याला फिरण्याचा आणि संगीत ऐकण्याचा विशेष छंद आहे. याशिवाय त्यांना मीडिया क्षेत्र आणि विमान वाहतूक क्षेत्रातही रस आहे. काव्याने सन टीव्ही नेटवर्कसोबत 2019 मध्ये काम करण्यास सुरुवात केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर काव्याने वडील कलनिधी मारन (kaviya maran father) यांच्या व्यवसायात प्रवेश केला. कलानिधी मारन हे दक्षिण भारतातील सर्वात मोठे टीव्ही नेटवर्क सन टीव्हीचे (Sun Tv) मालक आहेत. या नेटवर्कमध्ये 32 चॅनेल आणि 24 एफएम रेडिओ स्टेशन आहेत.Source link

Leave a Reply