माझे न्यूड फोटो मागितले आणि…; अभिनेत्याकडून कास्टिंग काऊचचा धक्कादायक खुलासा


मुंबई : Casting couch हा काही नवीन शब्द नाही. गेल्या काही वर्षांपासून कलाजगतामध्ये घडलेल्या असंख्य कास्टिंग काऊचच्या घटना वाऱ्यासारख्या व्हायरल झाल्या. काही घटनांबाबत ऐकल्यानंतर ऐकणाऱ्यांना हादराच बसला. जर, तुम्हाला वाटत असेल की फक्त मुली किंवा अभिनेत्रीच कास्टींग काऊचचा शिकार होतात, तर तसं नाहीये.  

कारण, एका अभिनेत्यानं नुकताच त्याच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रसंगाचा उलगडा करत कला जगताला हादरा दिला आहे. हा अभिनेता आहे अंकित सिवाच. आपल्यासोबत घडलेला प्रसंग नेमका किती विदारक होता हे सांगताना अंकितनं एका वळणावर तर मी कलाविश्व सोडण्याचा निर्णयही घेतल्याचं सांगितलं. 

न्यूड फोटोंची मागणी… 
‘ये झुकी झुकी सी नजर’मुळं प्रसिद्धीझोतात आलेल्या अंकित सिवाच (Ankit Siwach) नं सांगितल्यानुसार त्याला अशा पार्टीला बोलवलं जात होतं, ज्याचा कामाशी काहीच संबंध नव्हता. त्याच्या हेसुद्धा लक्षात आहे जेव्हा त्याच्याकडे संपूर्ण नग्न अवस्थेतील फोटोंची मागणी करण्यात आली होती. हे ऐकूनच त्याला धक्का बसला होता. 

‘मला कायम वाटायचं की सगळे चांगलेच आहेत. पण, हीच बाब तुम्हाला कमकुवत करते आणि प्रत्येकजण याचाच फायदा घेतं. माझी प्रत्येक मार्गानं छळवणूक झाली ज्यासाठी मी तयार नव्हतो’, असं तो म्हणाला. 

कास्टिंग काऊचसाठी त्याच्यावर बळजबरी झाली नसली तरीही, हेच केल्यानंतर तुला पुढची वाट चालता येईल अशा शब्दांत त्याला धाक दाखवला गेला होता. जेव्हा लोकं आपला शिकार करण्यासाठी अशा अवस्थेत तयार असतात तेव्हा तुम्ही सर्वकाही सोडून परतायलाच निघता असं म्हणत एका आव्हानात्मक काळावरून त्यानं पडदा उचलला. 

कास्टिंग काउच का शिकार हो चुका है ये स्टार, बोले- मुझसे मांगी गई थीं न्यूड तस्वीरें

मॉडेलिंगकडून अभिनयाकडे वळत असताना अंकितचा प्रवास वाटला तितका सोपा नव्हता हेच त्यानं सांगितलेल्या या अनुभवानं स्पष्ट केलं. Source link

Leave a Reply