‘मुन्नाभाई MBBS’ मधील डॉ. रुस्तम आठवतोय का? बाजूने गेला तरी ओळखता येणार नाही


मुंबई : अभिनेता संजय दत्त याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या ‘मुन्नाभाई MBBS’ या चित्रपटानं एक वेगळीच जादू प्रेक्षकांवर केली होती. आजही या चित्रपटाच्या लोकप्रियतेत तसुभरही कमतरता झालेली नाही. चित्रपटाच्या कथानकापासून ते अगदी त्यातील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मनं जिंकली. 

म्हणजे अगदी सहायक भूमिकेमध्ये दिसणारे चेहरेही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला. यातीलच एक चेहरा, एक पात्र म्हणजे डॉक्टर रुस्तम. 

सतत चिडचीड करणारा आणि काहीसा घाबरणारा डॉक्टर रुस्तम सर्वांनाच आवडला. ही भूमिका साकारली होती अभिनेता कुरूश देबू यानं. 

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कुरुश चर्चेत राहिला. त्यानंतरही काही वर्षे त्याला प्रेक्षक विसरु शकले नाहीत. पण, आता त्याचा हल्लीचाच लूक समोर आला आणि सर्वांना धक्काच बसला. 

काही वर्षांपूर्वी कुरुशचा एक फोटोही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो शर्ट, टाय अशा रुबाबदार रुपात दिसला. ज्यानंतर आता एकाएकी त्याचा हाच जुना फोटो ट्रेंड होऊ लागला. 

कुरुश ऑन कॅमेरा इतका वेगळा दिसतो आणि ऑफ कॅमेरा इतका वेगळा हे पाहून चाहते थक्कच झाले. काहींनी तर, त्याला ओळखलंही नाही. 

यानंतर अनेकांनीच हा अभिनेता सोशल मीडियावर कुठे सापडतो का याचाही शोध घेतला. तो सापडला खरा, पण इथंही त्याचं असंच रुप दिसलं. 

वयानुसार माणसाची चेहरेपट्टी बदलते. पण, कुरूश इतका बदलेल ययाची कल्पनाच नसल्यामुळं त्याला आता पाहून चाहते हादरत आहेत. Source link

Leave a Reply