मुंबईतील रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसलेल्या ‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींना कोणी ओळखलंच नाही?

[ad_1]

मुंबई : जो मुंबई लोकलनं प्रवास करायला शिकला, तो कुठेही प्रवास करु शकतो, असं अनेकजण म्हणतात. अनेकांना ती अतिशोक्ती वाटेल, पण मुंबईच्या गर्दीनं खचून भरलेल्या लोकलनं प्रवास करणाऱ्यांना मात्र ही बाब पटेल. (Liegr promotion Actor Vijay Deverakonda and actress Ananya Pandey travels in Mumbai Local Train)

मुंबईची लाईफलाई अशी या लोकल सेवेची ओळख. त्यामुळं ती ठप्प झाली, की अर्ध्याहून अधिक मुंबईच ठप्प होते. याच लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी एक असा क्षणही आला, जेव्हा चक्क आलिशान कारमधून फिरणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी रेल्वे मार्गानं प्रवास केला. 

आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी फिरणारे हे दोन लोकप्रिय चेहरे प्लॅटफॉर्मवर बसलेले असताना कोणाच्या ही बाब लक्षातही आली नसावी. पण, जेव्हा त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा मात्र अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

हे कलाकार म्हणजे अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता विजय देवरकोंडा. हे दोघंही सध्या Liegr या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहेत. 

याच निमित्तानं त्यांनी मुंबई लोकलनं प्रवास करण्याचाही अनुभव घेतला. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रमोशन फंड्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

https://youtu.be/1Llkn7Et9zw

चित्रपटाच्या प्रसिद्धी निमित्तानं का असेना, पण अनन्या आणि विजयलाही वेगळी मुंबई पाहण्याची संधी मिळाली असणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *