Headlines

“मुंबईचाही आम्हाला अभिमान, मात्र…” राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत ज्येष्ठ कलावंतांनी स्पष्ट केली भूमिका

[ad_1]

“आम्ही महाराष्ट्रात राहतो त्यामुळे मुंबईचाही आम्हाला अभिमान आहे. मात्र आम्ही कलावंत असून राजकारणाशी आमचा काही संबंध नाही.”, असे सांगत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि मोहन जोशी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर बोलणे टाळले.

राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले…

राज्यपालांनी मराठी अस्मितेलाच नख लावल्याची टीका सर्व स्तरातून होत असताना व सामान्य मराठी माणूसही राज्यपालांच्या व्यक्तव्याचा निषेध करीत असताना मराठीमुळे ज्यांना धन-प्रतिष्ठा मिळाली ते मराठी कलावंत भूमिका घेण्याचे धाडस करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यपालांना घरी पाठावयाचं की तुरुंगात याचा विचार करण्याची वेळ आली आहे – उद्धव ठाकरे

नागपुरातील मो. रफी फॅन्स कल्चरल ऑर्गनायझेशन आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पद्मश्री मो. रफी सन्मान सोहळ्यानिमित्त अभिनेते सचिन पिळगावकर, अशोक सराफ व मोहन जोशी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राज्यपाल काय बोलले याची माहिती आम्हाला नाही –

मुंबई ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही आणि मुंबई महाराष्ट्राकडे पैसाच उरणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केले होते. राज्यपालांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रात अनेक मराठी भाषिकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. मात्र यावर बोलताना ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि मोहन जोशी यांनी “आमचा राजकारणाशी काही संबंध नाही आणि त्यात स्वारस्य नाही. आमचा तो विषय नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय बोलले याची माहिती आम्हाला नाही.” असे म्हणत बोलणे टाळले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *