Headlines

Mumbai maharashtra live news today rainfall updates eknath shinde vs uddhav thackeray latest news dasara melava 14 september 2022

[ad_1]

Maharashtra Crisis Live Updates in Marathi : दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी आपल्यालाच परवानगी मिळणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत सर्वप्रथम शिवसेनेने अर्ज केला. त्यानंतर शिंदे गटातर्फे आमदार सदा सरवणकर यांनी महापालिकेकडे अर्ज केला. सध्या महापालिकेकडे दोन्ही अर्ज प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिंदे गटाची बैठक वांद्रे येथे झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दसरा मेळाव्याच्या तयारीसह इतर विषयांबाबत चर्चा केली. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी बैठकीत व्यक्त केला.

दोन वर्षांपूर्वी पालघरमध्ये घडलेल्या साधूंच्या हत्याकांडाने संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. अशातच आता सांगली जिल्ह्यातही चार साधूंना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलं चोरणारी टोळी समजून या साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. जत तालुक्यातील लवंगा येथे ही घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तर ‘वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आता गुजरातकडे वळली आहे. या गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड केल्याचे वेदांत समूहाने जाहीर केले असून, या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार, शेकडो कोटींच्या कर महसुलास महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया देताना पूर्वी सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवलं आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra Latest News Updates, 14 September 2022: अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारमुळे वाढणार आहेत. सोमवारी रात्री झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये शिंदे सरकारने केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेला म्हणजेच सीबीआयला देशमुखांविरोधात खटला चालवण्यास हिरवा कंदील दिला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *