मुंबई इंडियन्ससाठी हे 5 खेळाडू ठरले विलन, प्लेऑफमधून संघाला केलं बाहेर


IPL 2022 : मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफचा मार्ग बंद झाला आहे.  IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या रेसमधून बाहेर झाली आहे. मुंबईने लागोपाठ 7 सामने गमावले आहेत. मुंबईसाठी या 5 खेळाडूंनी खराब कामगिरी केल्यानंतर संघाला देखील प्लेऑफमधून बाहेर केलं आहे.

1. जसप्रीत बुमराह 

मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचा खेळाडू असलेला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आयपीएल 2022 मध्ये हवी तशी कामगिरी करु शकला नाही. त्याने आयपीएल 2022 मध्ये 7 सामन्यांमध्ये फक्त 4 विकेट घेतले आहेत.

2. जयदेव उनादकट 

जयदेव उनादकट (Jaydev Unadkat) ची जादू ही फिकी पडली आहे. त्याच्या बॉलिंगवर विरोधी संघाने बरेच रन काढले. IPL 2022 मध्ये 3 सामन्यांमध्ये त्याने फक्त 4 विकेट घेतले. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध तो काही विशेष करु शकला नाही. धोनीने त्याच्या बॉलिंगवर जोरदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

3. ईशान किशन

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध ईशान किशन (Ishan Kishan) खातं ही उघडू शकला नाही. टीमला त्याच्याकडून मोठी आशा होती. त्याने 7 सामन्यांमध्ये 191 रन केले आहेत.

4. कीरोन पोलार्ड

कीरोन पोलार्ड (Kieron Pollard) आयपीएल 2022 मध्ये तो जास्त काही करु शकला नाही. IPL 2022 मध्ये आतापर्यंत त्याने फक्त 101 रन केले. ज्यामुळे संघाला देखील त्याचा काही फायदा झाला नाही.

5. रिले मेडेरिथ

चेन्नई सुपर किंग्सच्या विरुद्ध रिले मेडेरिथ (Riley Meredith)  फक्त 1 विकेट घेऊ शकला आहे. त्याने 4 ओव्हरमध्ये 25 रन दिले.Source link

Leave a Reply