Headlines

मुंबई इंडियन्स आणि 16 कोटींचा ‘वडापाव’? वादात सापडलेलं हे प्रकरण आहे तरी काय?

[ad_1]

मुंबई : वीरेंद्र सेहवाग भारताच्या अशा माजी खेळाडूंपैकी एक आहे जो सतत सोशल मीडियावर सक्रिय असतो. सेहवागने नुकतीच एक अशी पोस्ट केली आहे ज्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर त्याने ट्विटमध्ये ‘वडा पाव’ असा उल्लेख केला. यावर मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल केले.

पॅट कमिन्सच्या झंझावाती खेळीच्या बळावर कोलकाताने बुधवारी मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला. सामना संपल्यानंतर सेहवागने ट्विट केले की, “तोंडातून घास हिसकावला, माफ करा वडा पाव. हिसकावला. पॅट कमिन्स, क्लीन हिटिंगच्या सर्वोत्तम कामगिरीपैकी एक… 15 चेंडूत 56.”

सेहवागच्या या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. काही तासांनंतर सेहवागने यावर स्पष्टीकरण दिले. त्याने आणखी एक ट्विट केले आणि लिहिले, “वडा पाव म्हणजे मुंबई, वडा पावसाठी ओळखले जाणारे शहर. रोहितच्या चाहत्यांनो शांत व्हा, मी तुमच्यापैकी बहुतेक लोकांपेक्षा त्याच्या फलंदाजीचा मोठा चाहता आहे.”

या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 4 बाद 161 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 52 धावा केल्या. टिलक वर्माने 27 चेंडूत नाबाद 38, डेवाल्ड ब्रेव्हिसने 29 आणि किरॉन पोलार्डने पाच चेंडूत 22 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने 16 ओव्हरमध्ये 5 गडी गमावत 162 धावा करून सामना जिंकला. पॅट कमिन्सने 15 चेंडूत नाबाद 56 आणि व्यंकटेश अय्यरने 41 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या.

मुंबईच्या पराभवानंतर अनेक युजर्सकडून संघावर टीका होई लागली. रोहित शर्मा देखील यातून सूटला नाही. एका युजरने वडा पावचा उल्लेख करत मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माला डिवचण्याचा प्रयत्न केला. रोहित शर्मा फक्त 3 रनवर माघारी परतला. त्यामुळे मुंबईने 16 कोटी रुपये वाया घालवले अशी टीका चाहत्यांकडून करण्यात आली. मुंबईने रोहित शर्मासाठी 16 कोटी रुपये मोजले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *