Headlines

मुलीच्या जन्मानंतर या राज्यात सरकार देणार ’21 हजारांचा शगुन’

[ad_1]

नवी दिल्ली : गर्भपात रोखण्यासाठी आणि मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सरकारनं नवीन योजना सुरू केली आहे. मुलींच्या हितासाठी ही योजना आहे. असं म्हणतात की मुलगी जन्माला येते तेव्हा बाप धनवान होतो असं म्हटलं जातं. मात्र आता हे प्रत्यक्षात खरं होणार आहे. ज्या घरात मुलगी जन्माला आली तर 21 हजार रुपये शगुन म्हणून सरकार देणार आहे. 

मुलींना सशक्त करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल

हरियाणा इथे भाजप-जजपा सरकारनं आता मुलींना सशक्त करण्यासाठी एक योजना आणली आहे. ‘आपकी बेटी-हमारी बेटी’ असं या योजनेचं नाव आहे. ही योजना सगळ्यांसाठी लागू असणार आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्या नेतृत्वामध्ये सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. मुलींना सशक्त करण्यासाठी ही योजना असणार आहे. 

‘आपकी बेटी-हमारी बेटी’ योजना काय?

मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारनं ‘आपकी बेटी-हमारी बेटी’ ही योजना आणली आहे. या योजनेचा उद्देश मुलींचा वाढता गर्भपात रोखणं आहे. याशिवाय समाजातील दृष्टीकोन बदलण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे. मुलींना उत्तम शिक्षण मिळावं आणि मुलींना सक्षम करण्यासाठी ही योजना आणली जाणार आहे. 

असा मिळणार 21 हजाराचा शगुन 

या सगळ्या योजना पूर्वा अनुसूचित जातीजमातीसाठी आणि BPL कुटुंबासाठी होती. मात्र आता सामान्य नागरिकांनाही याचा लाभ घेता येणार आहे. पहिली मुलगी असेल तर 21 हजार रुपये आणि दुसरी किंवा तिसरी मुलगी असेल तर तिचा जीवन विमा 21 हजार रुपये अशी रक्कम सरकारकडून मिळणार आहे. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोख रकमेऐवजी याचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मुलीची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम एनकॅश करता येणार आहे. ही अट सरकारनं ठेवली आहे. लाभार्थी मुलगी ही 18 वर्ष पूर्ण आणि अविवाहित असायला हवी असंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *