मुकेश अंबानींच्या कुटुंबात कोण करतंय दुसरं लग्न? पाहून विश्वासच बसणार नाही


मुंबई : भारतीय उद्योग जगतामध्ये अंबानी या नावाला नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातही अंबानींच्या व्यवसायाचा बराच विस्तार झाला आहे. अशा या उद्योजकाच्या कुटुंबानंही कायमच सर्वांना थक्क करण्याचं काम केलं आहे. लेकी-मुलांपासून सुनांपर्यंत, अंबानी कुटुंबातील प्रत्येकानं आपली वेगळी ओळख तयार केली आहे. 

अशा या देशातील बहुचर्चित कुटुंबात आता पुन्हा एकदा लग्नाच्या सनईचे सूर घुमणार आहेत. कारण या घरातील मुलीचं म्हणे दुसऱ्यांदा लग्न होणार आहे. (Mukesh Ambani)

सूत्रांच्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांची बहीण दिप्ती साळगावकर यांची मुलगी इशिता साळगावकर ही येत्या काळात दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी सज्ज आहे. ती व्यावसायिक श्यामल अनिल बोदानी (Shyamal Anil Bodani) याच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. 

नुकतंच या लग्नाच्या आधी कॉकटेल पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं एकाएकी या नववधूनं सर्वांचं लक्ष वेधलं. इशितानं यावेळी तिच्या लूकसाठी एका आयव्हरी शेडमधल्या साडीला पसंती दिली होती. 

अंबानी कुटुंबात सुरु असणारं लग्नसराईचं वातारण पाहता आता या लग्नाचीही बरीच चर्चा होणार असं म्हणायला हरकत नाही. किंबहुना या चर्चांची सुरुवातही झाली आहे. 

फारशी प्रकाशझोतात नसणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नात आता नेमकी कोणाची उपस्थिती पाहायला मिळेल, याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे. Source link

Leave a Reply