Headlines

MS Dhoni Viral Video: ढेकळं फोडली.. ट्रॅक्टर चालवला.. धोनीच्या नव्या लूकची चर्चा; IPL आधी माहीची वावरात प्रॅक्टिस!

[ad_1]

MS Dhoni Farming Viral Video: टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं (MS Dhoni) बाईक्स प्रेम सर्वांनाच माहित आहे. एकापैक्षा एक क्लासिक बाईक्स आणि सुपरबाईक्स धोनीच्या ताफ्यात (MS Dhoni bike collection) पहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतली असली तरी तो सध्या आयपीएलचे (IPL)  सामने खेळतो आणि जिंकवतो सुद्धा. धोनीने आयपीएलच्या आगामी IPL 2023 हंगामासाठी सराव सुरू केला आहे. अशातच धोनीचा एक व्हिडिओ (MS Dhoni Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय.

थाला धोनी सोशल मीडियावर खूपच कमी सक्रिय असतो. मात्र, त्याची पत्नी साक्षी (MS Dhoni Wife) अनेकदा त्याचे व्हिडिओ शेअर करताना दिसते. त्याचवेळी 2 वर्षांनंतर धोनीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर (MS Dhoni Instagram) एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये माहीचा आणखी एक नवा अवतार पहायला मिळतोय. 

MS Dhoni चा नवा Video – 

एक व्हिडिओ शेअर (MS Dhoni Video) केला आहे, ज्यामध्ये तो शेतात नांगरतोय. धोनीने यापूर्वी 2021 मध्येही एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो शेतातील पिक दाखवताना दिसला होता. त्यानंतर आता त्याचा नवा व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये धोनी शेतात नांगरणी (MS Dhoni Drives Tractor) करत असल्याचं दिसतोय. कधी बनियनवर, तर कधी निळ्या टी शर्टवर धोनी दिसतोय. त्यामुळे आयपीएलमधून निवृत्ती (MS Dhoni Retirement) घेतल्यानंतर धोनी शेती करणार काय?, असा सवाल नेटकरी विचारत आहेत.

दरम्यान, धोनी नियमितपणे फलंदाजी आणि यष्टीरक्षणाचा सराव करत असतो. झारखंडमधील जेएससीए स्टेडियममध्ये धोनी अनेकदा दिसून येतो. टेनिस, बॅडमिंटन आणि क्रिकेट खेळताना तो दिसून येतो. तर त्याच्या गाडीचे अनेक फोटो देखील व्हायरल होत असतात.

IPL 2023 नंतर धोनी निवृत्ती घेणार?

सध्या धोनी आयपीएल (IPL) खेळतोय. आगामी हंगामात म्हणजे आयपीएल 2023 मध्ये देखील तो सीएसकेकडून खेळेल. मात्र, त्यानंतर धोनी निवृत्ती (MS Dhoni IPL Retirement) घेणार असल्याची शक्यता आहे. मला चेन्नईच्या मैदानावर शेवटचा सामना खेळायचा आहे, असं म्हणत त्याने निवृत्तीचे संकेत दिले होते.

आणखी वाचा –  MS Dhoni: धोनीला पाहताच पांड्याने घातला ड्रेसिंग रूममध्ये राडा? नेमकं काय घडलं? पाहा Video

धोनीची चित्रपटात एन्ट्री 

धोनीने चित्रपट निर्मितीतदेखील (MS Dhoni Police Inspector Look) पाऊल टाकलं आहे. धोनी एंटरटेनमेंट प्रोडक्शनच्या पहिल्या चित्रपटाचे मोशन पोस्टर गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालं होतं. हातात पिस्तूल, पोलिसांची वर्दी, असा तामिळ चित्रपटात धोनी दिसणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *