मृत्यूनंतरच संपली ‘या’ अभिनेत्याची Love Story; जिच्यावर प्रेम केलं तीसुद्धा अखेरच्या क्षणी सोबत नव्हती


मुंबई : प्रेम…. फक्त भावनाच नाही, तर एक अनुभव आहे. हे प्रेम एकतर तुम्हाला खूप काही देऊन जातं. किंवा मग तुमच्याकडून सर्वकाही हिरावून घेतं. हिंदी चित्रपटसृष्टीत आपण अशी बरीच उदाहरणंही पाहिली असतील. पण, प्रेमाच्या आणाभाकांचा उल्लेख झाला, की एका नात्याची हमखास चर्चा होते. हे एक असं नातं ज्याची चर्चा खूप झाली, पण शेवट मात्र वाईट झाला. 

या नात्यात एकाचा मृत्यू झाला आणि तिथंच सर्व वाटा बंद झाल्या. या अभिनेता/ दिग्दर्शकाच्या निधनानं सारं कलाजगत हळहळलं, पण तेव्हा फारच उशीर झाला होता. (Gurudutt waheeda rehman love story)

प्रेमात सपशेल अपयशी ठरलेल्या या कलाकाराचं नाव होतं गुरुदत्त. अभिनेत्री वहिदा रहमान यांच्यासोबत गुरुदत्त यांचं नाव जोडलं गेलं आणि एक वेळ अशी आली, जेव्हा वहिदा आणि गुरुदत्त एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. (waheeda rehman )

आपल्याच निर्मिती संस्थेतून साकारण्यात आलेल्या ‘CID’ या चित्रपटातून त्यांनी रहमान यांना पहिली संधी दिली. पुढे ‘प्यासा’ चित्रपटातून गुरुदत्त आणि वहिदा रहमान यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहता आली. 

तिथं या चित्रपटानं क्रांती घडवली पण, गुरुदत्त आणि गीता दत्त यांच्या वैवाहिक नात्यात मात्र दुरावा येण्यास सुरुवात झाली. दर दिवसाचे वाद विकोपास गेले आणि अखेर 1957 मध्ये या नात्यात मोठं वादळ आलं. गुरुदत्त आणि गीता एकमेकांपासून वेगळे राहू लागले. 

ही तिच वेळ होती जेव्हा गुरुदत्त आपल्या कोणत्याही चित्रपटाचा विचार वहिदा यांच्याशिवाय करुच शकत नव्हते. अबरार अल्बी यांनी ’10 ईयर्स विद गुरु दत्त’ नावाच्या पुस्तकात याचा उल्लेख केला होता. 

वहिदा यांच्या कुटुंबीयांचाही या नात्याला विरोध होता. कारण होतं, ते म्हणजे या दोघांच्या धर्मांमध्ये असणारा फरक. पुढे वहिदा यांनाही या नात्याचं कोणतंही भविष्य नाही याची जाणीव झाली आणि गुरुदत्त यांनीही 1963 पासून वहिदा यांना दूर केलं. 

पत्नी आणि मुलं वेगळी होणं, वहिदानं दूर असणं हे सर्व मानसिक आघात सहन करत गुरुदत्त येणारा प्रत्येक दिवस रेटत होते. त्यांना आपल्या लहान मुलीला भेटायचं होतं, पण गीता दत्त यांनी यासाठी नकार दिला होता. गुरुदत्त इथं मद्याच्या नशेत पुरते बुडाले होते. लेकिला भेटी दे नाहीतर तू माझं मेलेलं तोंड पाहशील, असा इशाराही त्यांनी दत्त यांना दिला. 

10 ऑक्टोबर 1964 ला अबरार यांच्याकडे एक फोन आला ज्यामाध्यमातून त्यांना गुरुदत्त यांची तब्येत खालावल्याची माहिती मिळाली. गुरुदत्त यांच्या घरी जाताच तिथं ते पलंगावर सदरा-लेंगा घालून झोपल्याचं दिसले. बाजूलाच एक ग्लास होता. त्यात गुलाबी रंगाचं कसलंसं द्रव्य होतं. 

guru dutt was deeply in love with geeta dutt and waheeda rehman and tragic  breakup story | प्यार में डूबे गुरु दत्त को पत्नी और प्रेमिका में करना पड़ा  चुनाव, जिसके बाद

गुरुदत्तनं आत्महत्या केली… हेच उदगार अबरार यांच्या तोंडून निघाले. अबरार यांना ठाऊर होतं, कारण मृत्यूच्या काही दिवस आधी ते आयुष्य संपवण्याच्या मार्गांबद्दलच  बोलत होते. असं असलं तरीही आजपर्यंत गुरुदत्त यांच्या मृत्यूचं गुढ मात्र उलकलंच नाही. 

गुरुदत्त यांचं निधन झालं आणि त्याच क्षणी वहिदा रहमान यांच्याशी असणारं त्यांच्या नात्यानंही अखेरचा श्वास घेतला. एका नात्यासोबतच एका कलाकाराचा झालेला हा करुण अंत आजही अनेकांनाच भावूक करतो…. नकळत गाणं आठवतं..’हमने तो जब कलियां मांगी, काँटों का हार मिला… ‘Source link

Leave a Reply