Headlines

मोठ्या आजारातून सावरली, म्हणून आज दीपिका आपल्यासमोर; नाहीतर…

[ad_1]

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण ही लाखात एक आहे, दीपिकानं तर नशीब काढलंय, दीपिका म्हणजे जणू एक स्वप्नसुंदरी, अशाच शब्दात या अभिनेत्रीचं आजवर चाहत्यांनी कौतुक केलं  आहे . पदार्पणापासून ते अगदी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गहराईयां’ या चित्रपटापर्यंत तिचा प्रवास हेवा वाटण्याजोगा. (Deepika Padukone)

दीपिकानं तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत मिळवलेलं स्थान पाहता तिचं कौतुक करावं तितकं कमी. 

पण, तुम्हाला माहितीये का; सतत सर्वांसमोर हसतखेळत असणाऱ्या या दीपिकानं एक काळ असाही पाहिला जेव्हा तिला सर्वच गोष्टी अशक्य दिसत होत्या. 

नैराश्य आणि ताणतणावानं दीपिकाच्या आयुष्याला विळख्यात घेतलं होतं. अचानक वाटणारी भीती, हृदयाचे वाढलेले ठोके आणि मानसिक ताणतणाव हे सारं तिला मोठ्या प्रमाणात सतावू लागलेलं. 

भारतात जवळपास 5 कोटींहून अधिक नागरिक असे आहेत, ज्यांना या आजारांनी ग्रासलं आहे. पण, ज्यावर फार कमी लोक खुलेपणानं बोलतात. 

आपल्या नैराश्याविषयी खुलेपणानं आणि या गंभीर आजारातून सावरत सर्वांना सतर्क करणाऱ्यांपैकी एक आहे दीपिका पदुकोण. 

अभिनेता रणबीर कपूर याच्याशी रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप झाल्यानंतर दीपिकानं नैराश्याचा प्रदीर्घ काळासाठी सामना केला. 

2015 मध्ये तिनं संपूर्ण जगासमोर आपली ही समस्या ठेवली. कोणताही संकोच न बाळगता तिनं ही समस्या मांडत त्यातून  आपण नेमके  बाहेर कसे आलो हे  सांगितलं .  

आज अनेकजण त्यांच्या या आजाराविषयी बोलण्यास संकोचतात आणि पाहता पाहता हेच नैराश्य कित्येकांच्या जीवावरही बेततं. हे कुठेतरी थांबवून नैराश्याकडेही तितक्याच गांभीर्यानं पाहिलं जाणं गरजेचं आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *