मोठी बातमी! ईडीच्या छापेमारीत संजय राऊतांच्या घरी सापडली रोकड! | ed officials seized 11 and half lakh rupees from shiv sena leader sanjay raut home in raidतब्बल ९ तास चौकशी आणि छापेमारी केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले. त्यांना अटक केली जाण्याची दाट शक्यता आहे. ईडीने आपल्या या कारवाईत नेमका काय तपास केला? असे सातत्याने विचारले जात आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने आपल्या या कारवाईत संजय राऊतांच्या घरी साडे अकरा लाख रुपयांची रोकड सापडली असून ईडीने ही रक्कम जप्त केली आहे.

हेही वाचा >>> “अर्जुन खोतकरांनी विधानसभेवर दावा सांगावा, मी लोकसभेचा उमेदवार,” रावसाहेब दानवेंचा सल्ला

ईडीचे अधिकारी सकाळी ७ वाजेपासून राऊतांच्या ‘मैत्री’ या बंगल्यावर ठाणे मांडून होते. त्यांनी या काळात राऊतांच्या घराची छाननी केली. तसेच या कारवाईत ईडीने काही कागदपत्रे तपासली. यातील महत्त्वाची कागदपत्रे ईडीचे अधिकारी आपल्या सोबत घेऊन गेले आहेत. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चौकशी मोहिमेत ईडीने राऊतांच्या घरातील साडे अकरा लाख रुपये जप्त केले आहेत.

हेही वाचा >>> ९ तासांच्या छापेमारीत ईडीने काय केले? संजय राऊतांचे बंधू सुनिल राऊतांनी नेमके सांगितले, म्हणाले…

ईडीने राऊतांच्या बंगल्यात आणखी काय तपास केला याबाबत राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे. “त्यांनी मैत्री बंगल्यामध्ये तपास केला. माझ्या तिन्ही फ्लोअरची तपासणी केली. जेवढे कागदपत्रं हवे होते, तेवढे त्यांनी घेतले आहेत. आम्ही ती कागदपत्रे त्यांना अगोदरच दिली होती,” असे सुनिल राऊत यांनी सांगितलेले आहे.

हेही वाचा >>> संजय राऊतांवरील कारवाईनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “लज्जा, शरम…”

दरम्यान, या कारवाईमध्ये ईडीला आणखी कोणते पुरावे मिळाले याबाबची ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र आता ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. तसेच राऊतांवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. तसे संकेत खुद्द राऊत यांनीच दिलेले आहेत. मी स्वत:ला अटक करवून घेण्यासाठी चाललो आहे, असे ते म्हणाले होते.Source link

Leave a Reply